घरक्राइमवाहतूक पोलिसाला शिवीगाळ, मारहाण

वाहतूक पोलिसाला शिवीगाळ, मारहाण

Subscribe

पोलीस ठाण्यातील घटना, मारहाण करणार्‍या वाहनचालकास अटक

नाशिक : एका बेशिस्त वाहनचालकाने वाहतूक पोलिसाकडील ई चलन मशीन हिसकावून त्याची तोडफोड करत पोलिसांना शिवीगाळ केल्याची घटना सोमवारी (दि.२०) घडली. पोलिसांनी वाहनचालकास ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, वाहनचालकाने पोलीस ठाण्यातही एका पोलिसावर रॉडने हल्ला करीत दुखापत केली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात वाहनचालकाविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रितेश अशोक ललवाणी (३०, रा. मधुकमल नगर, सावरकर नगर) असे अट केलेल्या संशयिताचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, साहेबराव आर. गवळी हे सोमवारी (दि.२०) टिळकवाडी येथील जलतरण तलावाजवळ सेवा बजावत होते. त्यावेळी रितेश विनाहेल्मेट दुचाकी(एमएच १५ एफएक्स ०९९०)वरून आला. गवळी यांनी त्याच्यावर ई चलनमार्फत दंडात्मक कारवाई केली. त्यावेळी रितेशने गवळी यांना शिवीगाळ, मारहाण करीत त्यांच्याकडील ई चलन मशीन हिसकावून फोडले. त्यावेळी वाहतूक पोलीस अंमलदार संजय जगताप, मुंबईनाका पोलीस ठाण्याचे दोन अंमलदार घटनास्थळी आले. त्यांनाही रितेशने शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. अखेर पोलिसांनी त्यास ताब्यात घेत सरकारवाडा पोलीस ठाण्यात आणले. पोलीस ठाण्यातही रितेशने लोखंडी रॉडने पोलीस अंमलदार योगेश वायकंडे यांना मारहाण केली. त्यात योगेश यांच्या हाताला दुखापत झाली. त्यानंतर रितेशने आरडाओरड करीत शिवीगाळ केली. पोलिसांनी त्यास अटक केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -