घरमहाराष्ट्रनाशिकसपकाळ नॉलेब हबमध्ये 'अभाविप'चा ठिय्या

सपकाळ नॉलेब हबमध्ये ‘अभाविप’चा ठिय्या

Subscribe

सपकाळ नॉलेज हबमध्ये महिनाभरापासून वेतन थकीत असल्याने शिक्षकांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. परिणामी लेक्चर्स होत नसल्याने अभाविपच्या कार्यकर्त्यांनी महाविद्यालयात ठिय्या आंदोलन केले. यावेळी शेकडो विद्यार्थ्यांनी संस्थेविरोधात घोषणाबाजी केली. अखेर संस्थेचे चेअरमन रवींद्र सपकाळ यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करत २९ जानेवारीपासून नियमित लेक्चर होतील व आगामी ऑनलाइन परीक्षा पुढे ढकलण्यासाठी संस्था प्रयत्न करेल, असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

‘सपकाळ’ नॉलेज हबमध्ये गेल्या महिन्यापासून नियमित लेक्चर बंद असल्याच्या विरोधात गुरवार, २४ जानेवारीला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी महाविद्यालयात ठिय्या आंदोलन केले.

सपकाळ नॉलेज हबमध्ये महिनाभरापासून वेतन थकीत असल्याने शिक्षकांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. संस्थाचालकांच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत होते. ऑनलाइन व इनसेम परीक्षा तोंडावर असतानाच कॉलेजमध्ये लेक्चर्स होत नसल्याने संस्थाचालकांना विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी महाविद्यालयात प्रवेश करत ठिय्या आंदोलन केले. तब्बल चार तास चाललेल्या या आंदोलनात विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी शेकडो विद्यार्थ्यांनी संस्थेविरोधात घोषणाबाजी केली. अखेर महाविद्यालयीन प्रशासनाला झुकावे लागले. संस्थेचे चेअरमन रवींद्र सपकाळ यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली व मंगळवार, २९ जानेवारीपासून महाविद्यालयात नियमित लेक्चर होतील व आगामी ऑनलाइन परीक्षा पुढे ढकलण्यासाठी संस्था प्रयत्न करेल, असे लेखी आश्वासन मिळाल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.

- Advertisement -

..अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार

दरम्यान, आश्वासनांची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा अभाविपतर्फे देण्यात आला. यावेळी अभाविपचे जिल्हा संयोजक सागर शेलार, महानगर मंत्री प्रथमेश नाईक, योगेश्वरी सोनवणे, राकेश साळुंके, भूषण कामडी, अजय कनोजे, अथर्व कुळकर्णी, सौरभ धोत्रे, तेजल चौधरी, राहुल भिसे, सुयश सोनी, अतुल पाटील, सुवर्णा कुटके, रामेश्वर काळे, वैभव शहाणे, अभिषेक हिरे, सुमित जाधव यांसह विद्यार्थी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -