घर महाराष्ट्र नाशिक राजकारणामुळे आरोग्य अधिकार्‍यांवरील कारवाईला ब्रेक

राजकारणामुळे आरोग्य अधिकार्‍यांवरील कारवाईला ब्रेक

Subscribe

स्थानिक राजकारणामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील वादग्रस्त आरोग्य अधिकारी डॉ. प्रफुल्ल वसावे यांच्यावरील कारवाईची फाईल रोखल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात सुरु झाली आहे. उपाध्यक्ष नयना गावीत यांनी ही फाइल रोखल्याचा अंगुलीनिर्देश करत सदस्य रुपांजली माळेकर यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.

हरसूल गटातील शिरसगावचे आरोग्य अधिकारी डॉ. वसावे यांच्या विरोधात केंद्रातील कर्मचार्‍यांची तक्रारी होती. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांची नेमणूक करून डॉ. वसावे यांची चौकशी केली. चौकशीत डॉ. वसावे यांची जिल्हाबाहेर बदलीची शिफारस केली. यावर डॉ. डेकाटे यांच्याकडून कारवाई सुरू असतानाच डॉ. वसावे यांनी लसीकरणासाठी आलेल्या ग्रामस्थांना काढून देत, कर्मचार्‍यांना शिवीगाळ केली. यामुळे डॉ. वसावे यांच्यावर तत्काळ कारवाईची मागणी झाली. या प्रकारानंतर डॉ. वसावे यांची तात्काळ जिल्हाबाहेर बदली करावी, असा प्रस्तावाची फाईल कारवाईसाठी सादर केली. मात्र, ही फाईल जिल्हा परिषद उपाध्यक्षा यांच्याकडून रोखल्याची चर्चा आहे.

वैद्यकीय अधिकारी डॉ. वसावे यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. अहवालात ते दोषी असून, त्यांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे डॉ. वसावे यांची जिल्ह्याबाहेर बदली करण्यात यावी, अशा प्रस्तावाची फाईल मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर केली आहे.
– डॉ. विजय डेकाटे, जिल्हा आरोग्य अधिकारी

वैद्यकीय अधिकारी डॉ. वसावे यांच्या विरोधात ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. मात्र, सदर अधिकारी नंदुरबार येथील असल्याने त्यांची पाठराखण करण्याचे काम सुरू आहे. या दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अन्यथा ग्रामस्थांसह उपोषण केले जाईल.
– रुपांजली माळेकर, सदस्या, जिल्हा परिषद

हेही वाचा – व्यसनमुक्तीसाठी धावले नाशिककर
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -