युवक काँग्रेसकडून रास्ता रोको आंदोलन

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या केला निषेध

yuvak congress
युवक काँग्रेसकडून रास्ता रोको आंदोलन

उत्तर प्रदेश येथे काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने या निषेधार्थ जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने नाशिकमध्ये शालिमार चौकात रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी उत्तर प्रदेश सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळ्याफिती बांधून निषेध केला. यावेळी प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस नयना गावित, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील, माणिक जायभावे, महासचिव धनंजय कोठुळे, मध्य नाशिक सलमान काझी, आकाश घोलप, अण्णा मोरे, इगतपुरी विधानसभा अध्यक्ष दिलीप मुळाणे, जावेद पठाण, इगतपुरी युवक काँग्रेस प्रवक्ता रमेश देवगिरे, सूरज चव्हाण, कुणाल गांगुर्डे, आनंद जना, प्रथमेश शितोळे, फररोख काद्री व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.