घरमहाराष्ट्रनाशिकअजय बोरस्ते यांच्या गळ्यात जिल्हाप्रमुख पदाची माळ; तर 'हे' झाले सहसंपर्कप्रमुख

अजय बोरस्ते यांच्या गळ्यात जिल्हाप्रमुख पदाची माळ; तर ‘हे’ झाले सहसंपर्कप्रमुख

Subscribe

नाशिक : शिवसेना शिंदे गटाच्या वतीने मोठ्या प्रमाणात आयात करण्या सोबतच आता संघटना बांधणीकडेही लक्ष द्यायला सुरुवात झाली आहे. त्याच अनुषंगाने नुकतेच शिंदे गटात दाखल झालेले महानगर पालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते यांच्या गळ्यात जिल्ह्याध्यक्ष पदाची माळ टाकण्यात आली आहे. तसे तर बोरस्ते यांच्या पदाचे सूतोवाच मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या फळीतील पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशावेळी केले होते. परंतु बुधवारी (दि.११) मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी पार पडलेल्या खास सोहळ्यात बोरस्ते यांना जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वतः मुख्यमंत्री तथा शिंदे गटाचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनी सोपवली.

बोरस्ते यांच्यासह शिंदे गटात दाखल झालेले जेष्ठ माजी नगरसेवक राजू लवटे यांची सहसंपर्कप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. या पदग्रहण सोहळा प्रसंगी पालकमंत्री दादा भुसे, शिंदे गटाचे सचिव भाऊसाहेब चौधरी आदींसह मुख्य पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

ज्यावेळी अजय बोरस्ते यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला. त्यावेळी त्यांनी नाशिकमध्ये अभेद समजल्या जाणाऱ्या ठाकरे गटाला मोठे भगदाड पाडले. एकाच वेळी बारा माजी नगरसेवक आणि शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते आदींनी बोरस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे गटात प्रवेश केला. ठाकरे गटात जिल्हा संपर्क प्रमुख असलेले भाऊसाहेब चौधरी यांना शिंदे गटात गेल्यावर त्यांची सचिव पदी नियुक्ती करून बढती देण्यात आली होती. त्यानंतर बोरस्ते यांना बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून मोठी जबाबदारी मिळणार असल्याचे बोलले जात होते.दरम्यान बोरस्ते यांच्यावर आगामी नाशिक महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीची जबाबदारी राहणार आहे. त्यादृष्टीने पक्ष वाढीचे आव्हान असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -