घरमहाराष्ट्रनाशिकगोंदे ते प्रिंपीसदो सहापदरीकरणाला मंजूरी; 'समृद्धी' कनेक्टीव्हिटी होणार सुलभ

गोंदे ते प्रिंपीसदो सहापदरीकरणाला मंजूरी; ‘समृद्धी’ कनेक्टीव्हिटी होणार सुलभ

Subscribe

नाशिक : गोंदे ते पिंपरी सदो यांदरम्यान सहापदरी महामार्ग व्हावा, यासाठी खा. हेमंत गोडसे यांच्याकडून सुरू असलेल्या पाठपुराव्याला अखेर मोठे यश आले आहे. केंद्रिय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी गोंदे ते पिंपरी सदो या दरम्यानच्या महामार्गाचे सहापदरीकरण करण्यासाठी सुमारे सातशे कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. यामुळे नाशिक-मुंबईदरम्यानच्या वाहतुकीची कोंडी टाळणार आहे. तसेच, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या खान्देशातील प्रवाशांचा समृद्धी महामार्गाला सहजपणे प्रवेश होऊन मुंबईला कमीत कमी वेळेत पोहोचणे शक्य होणार आहे. गोंदे ते पिंपरी सदो या दरम्यानच्या सहापदरी महामार्गाचे 18 डिसेंबर रोजी केेंद्रियमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.

गोंदे फाटा ते पिंपरी सदो या दरम्यानच्या रस्त्यावर सतत वाहतुकीची मोठी कोंडी होत असते. पिंपरी सदो पासून समृद्धी महामार्ग हा अगदीच हाकेच्या अंतर्गत आहे .त्यामुळे नाशिक – मुंबई दरम्यानच्या महामार्गाचे सहा पदरीकरण व्हावे यासाठी गेल्या काही महिन्यांपासून खासदार हेमंत गोडसे यांचे प्रयत्न सुरू होते. या मागणीसाठी खासदार गोडसे यांनी दिल्लीत जाऊन रस्ते ,वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची अनेक भेट घेतली होती. नासिक – मुंबई महामार्गावरील वाहतूक टाळण्यासाठी आणि धुळे, जळगाव, नंदुरबार येथील प्रवाशांना पिंपरी सदो शिवारातील समृद्धी महामार्गावर लवकरात लवकर पोहोचण्यासाठी गोंदे ते पिंपरी सदो यादरम्यानच्या रस्त्याचे सहापदरीकरण होणे किती गरजेचे आहे हे खासदार गोडसे यांनी नामदार नितीन गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिले होते.

- Advertisement -

खासदार गोडसे यांची मागणी योग्य असल्याने ना. गडकरी यांनी गोंदे ते पिंपरी सदो या दरम्यानच्या रस्त्याचे सहा पदरीकरण करण्याचा निर्णय घेतला असून या कामासाठी सातशे कोटी रुपयांचा निधीला मंजुरी दिली आहे.येथे अठरा डिसेंबर रोजी गोंदे ते पिंपरी सदो या दरम्यानच्या वीस किलोमीटर रस्त्याच्या सहा पदरीकरणाच्या कामाचा शुभारंभ ना. गडकरी यांच्या हस्ते होणार असल्याची माहितीबी खासदार गोडसे यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -