घरक्राइमपुण्यात बाईक टॅक्सीविरोधात आंदोलन करणाऱ्या रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

पुण्यात बाईक टॅक्सीविरोधात आंदोलन करणाऱ्या रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

Subscribe

रॅपिडो बाईक टॅक्सीविरोधात रिक्षा संघटनांनी पुणे आरटीओ कार्यालयाबाहेर केलेल्या ठिय्या आंदोलनाविरोधात बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिक्षा संघटनेचे केशव क्षीरसागर, बाबा कांबळे, आनंद अंकुश यांच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रॅपिडो बाईक टॅक्सीविरोधात रिक्षा संघटनांनी पुणे आरटीओ कार्यालयाबाहेर केलेल्या ठिय्या आंदोलनाविरोधात बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिक्षा संघटनेचे केशव क्षीरसागर, बाबा कांबळे, आनंद अंकुश यांच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Case Registered Against The Office Bearers Of Rickshaw Associations Protesting Against Bike Taxis In Pune)

सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून ते रात्री ८ वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू होते. या आंदोलनामध्ये आरटीओ कार्यालयाच्या रस्त्यावर रिक्षा संघटनेकडून चक्काजाम करण्यात आला होता. परिणामी वाहतूक कोंडी झाल्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडवल्यामुळे आंदोलनकर्ते आणि पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

बाईक टॅक्सी रॅपिड ॲपमुळे रिक्षा चालकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत होता. या प्रकरणी रिक्षा संघटनांनी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन देखील दिले होते. हे ॲप बंद करण्याची रिक्षा संघटनांची मागणी होती. या विरोधात त्यांनी काल २८ नोव्हेंबरला पुणे आरटीओ कार्यालयाबाहेर आंदोलन केले. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी ‘रिक्षा बंद’चा फटका नागरिकांना सोमवारी बसला.

रिक्षा चालकांच्या आंदोलनामुळे ‘पीएमपी’ने अतिरिक्त १०० गाड्या सोडल्या, तरी त्या खचाखच भरून येत होत्या. रिक्षा बंदमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. बाइक टॅक्सी बंद व्हावी, रिक्षा परमिट बंद करावे, अशा विविध मागण्यांसाठी रिक्षा संघटनांकडून बेमुदत रिक्षा बंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा सर्वाधिक फटका शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, बाहेरगावी जाणारे व येणारे प्रवासी यांना बसला. तसेच, या आंदोलनातून काही रिक्षा संघटनांनी माघार घेतली होती. पण रिक्षाचालकांना दमदाटी करून रिक्षा फोडल्याच्या घटना घडल्या.

- Advertisement -

हेही वाचा – गोवा-मुंबई बस प्रवासात 22 वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू; विचित्र घटनेने पोलिसांमध्ये गोंधळ

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -