घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र'लीव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारी प्रियसी गरोदर राहताच प्रियकराने काढला पळ

‘लीव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारी प्रियसी गरोदर राहताच प्रियकराने काढला पळ

Subscribe

नाशिक : लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या २१ वर्षीय तरुणीला लग्नाचे अमिष देत तिच्यासोबत तरुणाने शारीरिक संबंध ठेवले. विशेष म्हणजे, गर्भवती राहिल्याने तरुणाने तिला जीव मारण्याची धमकी देत जातीवाचक शिवीगाळ करुन मुंबईला एकटी सोडून पळ काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी पीडित तरुणीने नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित प्रियकरासह त्याची आई आणि भावाच्या विरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आबिद सदरुद्दीन कोकणी (रा. त्र्यंबकेश्वर) असे गुन्हा दाखल झालेल्या प्रियकराचे नाव आहे.

- Advertisement -

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित तरुणी नाशिक – पुणे रोड परिसरात राहणारी आहे. तिच्या आईचा मृत्यू झाला असून, वडिलांनी दुसरे लग्न केले आहे. यामुळे ती आपल्या मावशी कडेच राहत होती. तिचे बारावीपर्यंतचे शिक्षण झाले आहे. मागील दोन वर्षापासून ती मुलींच्या वसतिगृहा मध्ये वास्तव्याला होती. याच दरम्यान आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी ती एका खाजगी ठिकाणी नोकरी देखील करत होती. नोकरी करत असतानाच पीडित तरुणीची संशयित आबिद सदरुद्दीन कोकणी याच्यासोबत ओळख झाली. कालांतराने ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्या दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेत ठाणे जिल्ह्यातील खडावली येथे भाडेकरारावर खोली घेतली. या ठिकाणी दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असताना संशयित आबिद याने पीडिते सोबत शारीरीक संबध प्रस्तापित केले. त्यातून पीडिता गर्भवती राहिली. ती पाच महिन्याची गर्भवती असतांना संशयित कामासाथी जातोय असे सांगून गेला मात्र त्यानंतर तो परत आला नाही. या दरम्यान, संशयिताने पीडितेला जीवे मारण्याची धमकी देत जातिवाचक शिवीगाळही करत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस अधिक तपस करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -