घरमहाराष्ट्रनाशिककोरोना कमी होताच चिकुनगुनिया, डेंग्यूचा हैदोस

कोरोना कमी होताच चिकुनगुनिया, डेंग्यूचा हैदोस

Subscribe

महापालिकेच्या आरोग्य विभागाची दहा पथके सर्वेक्षणासाठी तैनात

शहरात कोरोनाचा प्रभाव काही प्रमाणात कमी होताच आता चिकुनगुनियाने हैदोस घालायला सुरुवात केली आहे.अंबड व श्रमिकनगर भागात दोन दिवसात ३६ रुग्णांची नोंद झाली आहे. ही वाढ साखळी पद्धतीने पुढे सरकणारी असल्याने तिला वेळीच आळा बसावा, यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने दहा पथके तयार केली असून त्यांच्या माध्यमातून सर्वेक्षण सुरू केले आहे. दरम्यान, डेंग्यूचे एकूण ६५ रुग्ण आढळले आहेत.

नागरिकांच्या रक्ताचे नमुने घेतल्यानंतर दोन्ही रुग्णांचे आकडे समोर आले आहेत. डेंग्यूचे एकूण ६५ रुग्ण आढळले आहेत. याला आळा बसावा यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने दहा पथके तयार केली असून या भागात विविध ठिकाणी रवाना केली आहेत. त्यांच्याकडून घरोघरी जाऊन रक्ताचे नमुने घेतले जाणार आहे. जनजागृतीवर भर दिला जाणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पाणी साठते आहे. अशा जागा शोधून त्यावर फवारणी करण्यात येत आहे. पंक्चरच्या दुकानाबाहेर साठवणूक केलेले बिनकामाचे टायर जप्त करण्यात आले आहेत.

- Advertisement -

ही आहेत चिकुनगुनियाची लक्षणे

चिकुनगुनियाचे सर्वांत प्रमुख लक्षण ताप आहे. या रोगाची लक्षणे सामान्य तापाच्या लक्षणांपासून भिन्न असतात. कारण त्यासोबत सांध्यांच्या तीव्र वेदना असतात. या व्यतिरिक्त, मळमळ, पुरळ, डोकेदुखी आणि थकवा ही देखील सामान्य लक्षणे आहेत. डेंग्यू तापाची लक्षणे ही इतर विषाणूजन्य गंभीर तापाच्या लक्षणांसारखीच असतात. अचानक चढणारा ताप, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी व डोळयांच्यामागे दुखणे, रक्तस्त्रावित डेंग्यू ताप हा डेंग्यू तापाची गंभीर अवस्था आहे. याची सुरुवात तीव्र तापाने होते व त्याच्यासोबत डोकेदुखी, भूक मंदावणे, मळमळणे व पोटदुखी ही लक्षणे असतात. सुरुवातीच्या काही दिवसांत याची लक्षणे साध्या डेंग्यू तापासारखी असतात, क्वचितवेळी त्वचेवर पुरळ येते. रक्तस्त्रावित डेंग्यू तापाचे निदान अंगावरील दर्शनीय भागावर आलेल्या पुरळांवरून केली जाते. नाक, हिरड्या, व गुदव्दारातून रक्तस्त्राव ही लक्षणे कमी प्रमाणात आढळून येतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -