घरमहाराष्ट्रनाशिकभाजपने जातीपातीच्या राजकारणात शेतकरी संपवला : बच्चू कडू

भाजपने जातीपातीच्या राजकारणात शेतकरी संपवला : बच्चू कडू

Subscribe

भाजप सरकारला शेतकरी हिताच्या निर्णयाशी काहीही देणघेणे नसून जातीपाताच्या राजकारणात शेतकरी संपवल्याचे प्रतिपादन प्रहारचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी केले.

बहुमताच्या जोरावर ३७० व ३५ अ कलम रद्द करून भाजपाने देशहिताचा निर्णय घेतल्याचे स्वागत आहे. परंतु, याच बहुमताच्या जोरावर रखडलेला शेतकरी हिताचा स्वामिनाथन आयोग लागू का केला नाही. यामुळे या सरकारला शेतकरी हिताच्या निर्णयाशी काहीही देणघेणे नसून जातीपाताच्या राजकारणात शेतकरी संपवल्याचे प्रतिपादन प्रहारचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी केले.

तालुक्यातील काजीसांगवी येथे चांदवड तालुका प्रहार संघटनेच्यावतीने आयोजित शेतकरी कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष शरद शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष गणेश निंबाळकर, तालुकाध्यक्ष प्रकाश चव्हाण, राम बोरसे, हरिभाऊ महाजन, सरपंच साहेबराव सोनवणे, चेअरमन सुनील ठाकरे, शहीद सुरेश सोनवणे यांचे वडील विष्णू सोनवणे उपस्थित होते.
येथील भुमिपूत्र कारगील युद्धात शहीद सुरेश सोनवणे यांच्या स्मारकास व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अपर्ण करण्यात आले. शाखा फलकाचे अनावरण झाले. यावेळी आमदार कडू यांनी सत्ताधार्‍यांवर चौफेर हल्लाबोल करत, ३७० कलमाचा गाजावाजा करीत असताना एकीकडे शहीदांच्या कुटुंबियांना नऊ महिन्यापासून पेन्शन नसल्याने कुटुंबियांची उपासमार होत आहे. यामुळे सत्ताधार्‍यांचे हेच का देश प्रेम आहे का ? पुणेगाव डाव्या कालव्याचा प्रश्न माझ्या मतदारसंघात नसला तरी मी तो सोडवल्याशिवाय राहणार नाही याची ग्वाही आमदार बच्चू कडू यांनी दिली. बच्चू कडू यांनी येणार्‍या विधानसभेत ज्या ठिकाणी पक्षाची ताकद आहे अशा पंधरा ते वीस ठिकाणी जागा लढविण्याचा निर्धार केला. चांदवड मधून गणेश निंबाळकर यांना उमेदवारी देण्याचे संकेत दिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -