घरमहाराष्ट्रनाशिकभाजपचे पाऊल पडते पुढे

भाजपचे पाऊल पडते पुढे

Subscribe

जिल्ह्यातील १० जागांवर दावा, गेल्या निवडणुकीपेक्षा तीन अधिक जागांची मागणी (नांदगाव, दिंडोरी, इगतपुरीही हवे)

विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने जिल्ह्यातील नऊ जागांवर दावा केलेला असताना, भारतीय जनता पक्षाने मात्र एक पाऊल पुढे टाकत दहा जागांसाठी आग्रही भूमिका घेतली आहे. तसा प्रस्तावही स्थानिक पदाधिकार्‍यांनी मुंबईला पाठविला आहे. यातील सात जागा पक्षाला मिळण्याची शक्यता आहे.

आचारसंहिता जाहीर झाल्यानंतरही युतीबाबत अद्याप अनिश्चितता आहे. भाजपच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांनी निवडणूक स्वतंत्र लढण्याच्या तयारीत राहा, असा संदेश स्थानिकांना दिला असला तरीही युती केल्यास पक्षाला किती जागा आवश्यक आहेत, याबाबतचा प्रस्तावदेखील मागवून घेतला आहे. गेल्या वेळी युतीचे गुर्‍हाळ सुरू होते तेव्हा भाजपने सात जागांवर दावा केला होता. त्यात शहरातील नाशिक मध्य, पूर्व, पश्चिम, ग्रामीणमधील कळवण, सटाणा, चांदवड-देवळा, मालेगाव मध्य या मतदार संघांवर भाजपने दावा केला होता. मात्र युती दुभंगल्यानंतर सर्वच मतदारसंघात भाजपने नशीब आजमावून बघितले. आता या सात मतदार संघांबरोबरच नांदगाव, इगतपुरी आणि दिंडोरी मतदार संघातही भाजपने दावा केला आहे. इगतपुरीमध्ये काँग्रेसच्या तत्कालीन आमदार निर्मला गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने त्यांचे तिकीट निश्चित मानले जात आहे.

- Advertisement -

मात्र, भाजपकडून आता या उमेदवारीला आव्हान दिले जात आहे. या मतदार संघात भाजपकडून शिवराम झोले, विनायक माळेकर, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, परशराम वाघेरे यांच्यासह अन्य काही इच्छुकांनी उमेदवारीवर दावा केला आहे. तर दिंडोरी मतदारसंघात शिवसेनेचे माजी आमदार रामदास चारोस्कर, माजी आमदार धनराज महाले, जिल्हा परिषद सदस्य भास्कर गावित हे तीन प्रबळ दावेदार असल्यामुळे हा मतदार संघ भाजपला सुटण्याची शक्यता कमी आहे. नांदगावमधून सुहास कांदे आणि गणेश धात्रक यांनी उमेदवारीसाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. मात्र भाजपच्या जिल्हा परिषद सदस्या मनीषा पवार आणि माजी आमदार संजय पवार या दोघांनीही उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे या जागेवरुन शिवसेना आणि भाजपमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -