बंद गाळ्यात आढळले केमिकल प्रक्रिया केलेले मानवी अवयव

Pakistan: Hindu girl shot in the middle of the road after a failed kidnapping attempt
Hindu Girl Murder In Pakistan: पाकिस्तानात १८ वर्षीय हिंदू मुलीची भररस्त्यात हत्या

मुंबई नाका पोलीस ठाण्याजवळ असलेल्या सोसायटीच्या बंद पडलेल्या गाळ्यांमध्ये मानवी अवयव सापडल्याने एकच खळबळ आहे. वेगवेगळ्या बॉटलमध्ये केमिकल प्रक्रिया करून मानवी डोके, हात, कान असे वेगवेगळे मानवी अवयव आढळून आले आहेत. शिवाय, बादलीमध्ये केमिकल प्रक्रिया करून मानवी अवशेष ठेवल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी आठ कानसुद्धा आढळून आले आहेत. पोलीस चौकशीत दुकानमालकाने पंधरा वर्षापासून गाळे उघडले नाही याबद्दल मला काहीच माहित नाही असा खुलासा केला आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलिसांसह मुंबई नाका पोलिसांचे पथक दाखल झाले आहे.