घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रदुचाकीच्या शोरूममध्ये बॉम्ब असल्याच्या कॉलमुळे पोलिसांची धावपळ

दुचाकीच्या शोरूममध्ये बॉम्ब असल्याच्या कॉलमुळे पोलिसांची धावपळ

Subscribe

नाशिक : आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदती असलेल्या पोलिसांच्या ११२ नंबरवर शुक्रवारी (दि.२७) सायंकाळी ४ वाजता एका तरुणाने वाहनशोरुमध्ये बॉम्ब असल्याचा कॉल केल्यामुळे पोलीस यंत्रणेची धावपळ झाली. मात्र, द्वारका परिसरातील एका वाहन वितरक शोरुममध्ये बॉम्ब असल्याचा कॉल आला. मात्र, पोलीस तपासात भलतेच समोर आले. पोलिसांनी कॉल करणार्‍या तरुणाशी संपर्क साधला त्याने एका खासगी शिकवणी क्लासमध्ये बॉम्ब असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी शोध घेतला असता बॉम्ब मिळून आला नाही. दरम्यान, कॉल करणारा तरुण मनोरुग्ण संगमनेरमधून बेपत्ता असल्याचे समोर आले.

गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी व नागरिकांन मदत मिळण्यासह घटनास्थळी वेळेत पोहोचण्यासाठी पोलीस दलाने अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित केली आहे. कोणतीही घटना घडल्यास तात्काळ ११२ क्रमांक डायल करा, अवघ्या १० मिनिटांमध्ये पोलीस घटनास्थळी दाखल होतील. मात्र, फेक कॉल केल्यास गुन्हा दाखल केला जाईल, असा पोलीस यंत्रणेकडून सांगण्यात येत आहे. शुक्रवारी (दि.२७) सायंकाळी ४ वाजता पोलिस मदत केंद्राच्या ११२ नंबर वर कॉल आला. तरुणाने द्वारका परिसरातील एका वाहन वितरक शोरुममध्ये बॉम्ब असल्याची माहिती दिली. माहिती मिळतात नियंत्रण कक्षाने भद्रकाली आणि मुंबई नाका पोलिसांना सतर्क केले. काही वेळात पोलिसांसह श्वान पथक, बॉम्ब शोध पथक घटनास्थळी दाखल झाले. श्वान पथकाने शोरुममध्ये सर्व कर्मचार्‍यांना सुरक्षेच्या कारणास्तव बाहेर काढले. पथकाकडून सर्व शोरुम परिसरात कसून तपासणी केली. मात्र, बॉम्ब मिळून आला नाही. पोलीस अधिकार्‍यांनी कॉल केलेल्या व्यक्तीशी संपर्क साधला असता त्या व्यक्तीने सारडा सर्कल परिसरातील एका खासगी क्लासमध्ये बॉम्ब असल्याची माहिती दिली. पथकाने तत्काळ संबधीत क्लासकडे धाव घेत क्लासमधील सर्व विद्यार्थ्यांना सतर्क केले. क्लासमधील शिक्षकांना बाहेर येण्यास सांगून क्लासची तपासणी केली. मात्र बॉम्ब नसल्याचे निदर्शनास आले.

- Advertisement -

पथकाला संबधित तरुणाचा संशय आला. पोलिसांनी त्याला कॉल करत संपर्क साधला असता तो द्वारका परिसरात शोरुमच्या समोरुन बोलत असल्याचे समजले. त्याला पथकाने ताब्यात घेत चौकशी केली असता त्याच्या बोलण्यावरुन तो मनोरुग्ण असल्याचे समजले. त्याच्या कुटुंबियांशी संपर्क साधला असता तो संगमनेर येथील असल्याचे समजले. तो सात दिवसांपासून घरातून बेपत्ता असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली. एकी बाजूला मनोरुग्ण मुलगा मिळाल्याचा आनंद कुटुंबियांना होता. मात्र, दुसर्‍या बाजूला मुलामुळे पोलीस यंत्रणेला त्रास झाल्याचे समजताच त्यांनी पोलिसांकडे मुलाच्यावतीने माफी मागितली. पोलिसांच्या धावपळीने परिसरातील नागरिकसुद्धा सुरुवातील भयभीत झाले होते. मात्र, बॉम्ब नसल्याचे समजताच नागरिकांनीसुद्धा सुटकेचा नि:श्वास टाकला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -