घरमहाराष्ट्रनाशिकजिप कर्मचारी पतसंस्थेची बिनविरोधची परंपरा मोडीत; १५ जागांसाठी ६३ अर्ज दाखल

जिप कर्मचारी पतसंस्थेची बिनविरोधची परंपरा मोडीत; १५ जागांसाठी ६३ अर्ज दाखल

Subscribe

नाशिक : जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेची निवडणूक मागील ३ पंचवार्षिक बिनविरोध होत आलेली आहे. यंदाही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले होते. बिनविरोध निवडणूक व्हावी याकरता ११ सदस्यीय कोअर कमिटी नेमण्यात आली होती. परंतु त्यांच्या प्रयत्नांना अखेर अपयश आले व निवडणुकीसाठी एकूण १०६ अर्ज दाखल करण्यात आले. त्यापैकी ६३ अर्ज ग्राह्य धरले जाणार आहे. एकूण १५ जागांसाठी दी.६ नोव्हेबर रोजी मतदान पार पडेल.

मागील २ पंचवार्षिक ज्या पद्धतीने जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध झाली त्याच पद्धतीने यंदाही व्हावी आणि सलग तीन पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करून एक वेगळा आदर्श निर्माण करावा असा मानस जेष्ठ सदस्यांचा होता. त्याकरता रमाकांत अलई, सुभाष पवार, सदाशिव बारगळ, पंडित कटारे, रवींद्र आंधळे, संदीप गावडे यांच्यासह विजयकुमार हळदे, विलास शिंदे, राजाभाऊ जाधव, शेखर फसाळे व जी.पी. खैरनार तसेच इतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची कोअर कमिटी नेमण्यात आली होती.

- Advertisement -

 कोअर कमिटीकडून चतुर्थश्रेणी ४३४० सदस्य असलेल्या संघटनेला ३ जागा, लिपिक वर्गीय ६१५ सदस्यांच्या संघटनेला ३ जागा, आरोग्य विभागाला २ जागा, परिचर विभागाला ३ जागा, स्थापत्य अभियांत्रिकी विभागासाठी १ जागा. लेखा संवर्गासाठी १ जागा, वाहन चालक १ जागा व कोअर कमिटीला राखीव १ जागा अशा एकूण १५ जागा बिनविरोध करण्याचे निश्चित करण्याचे ठरले होते. त्यानुसार सर्वानुमते उमेदवारांच्या माघारीचे अर्ज देखील त्या त्या संघटनेच्या अध्यक्षांकडे देण्यात आले होते. मागील पंधरा दिवसापासून ही कोअर कमिटी बिनविरोध निवडणुकीसाठी काम करत होती. सर्ववर्गीय कर्मचार्‍यांच्या संघटनांशी याबाबत सकारात्मक चर्चा होऊन प्रयत्न अंतिम टप्प्यात आला असताना, ऐन वेळी बाह्य शक्तींचा शिरकाव निवडणुकीत झाल्याने बिनविरोध निवडणूक करण्याचा प्रयत्न फसल्याचा आरोप कोअर कमिटीने केला आहे.

मागील पंधरा दिवसांपासून बिनविरोध निवडणुकीची होण्याच्या दृष्टीकोणातून प्रक्रिया पार पडत असतांना सर्व संवर्गीय कर्मचारी संघटना पदाधिकारी व कोअर कमिटीमध्ये एकमत झालेले असतांना त्या प्रक्रियेला काही बाह्य शक्ती व उमेदवारांनी जाणीवपूर्वक सभासदांची दिशाभूल केली आहे. पर्यायाने निवडणुकीस सामोरे जावे लागत आहे. बऱ्याच उमेदवारांनी दोन किवा अधिक अर्ज ठेवले आहेत, ज्या उमेदवारांनी दोन किंवा अधिक ठिकाणी अर्ज ठेवले त्यांना सभासद धडा शिकवतील असा विश्वास आहे. : रविंद्र बापू थेटे, संस्थापक जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -