घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रबस अग्नितांडव : अखेर 'डीएनए'वरुन पटली 'त्या' मृत प्रवाशाची ओळख

बस अग्नितांडव : अखेर ‘डीएनए’वरुन पटली ‘त्या’ मृत प्रवाशाची ओळख

Subscribe

नाशिक : बस दुर्घटनेतील बाराव्या मृत प्रवाशाची ओळख पटवण्यात नाशिक शहर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी मृत प्रवाशी व त्याच्या वारसदारांची डीएनए चाचणी करत मृतदेहाची ओळख पटवली. मिनेश यादव इंगळे (रा. वसरी, ता. मालेगाव, जि. वाशीम) असे मृत प्रवाशाचे नाव आहे.

बस दुर्घटनेनंतर नाशिक शहर पोलिसांसमोर मृत प्रवाशांची ओळख पटवण्यासह वारसदारांचा शोध घेण्याचे आव्हान होते. मात्र, पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत मृत प्रवाशांची ओळख पटवली. पोलिसांनी जिल्हा रुग्णालयाच्या शवविच्छेदन विभागाच्या परिसरात प्रवाशांच्या वारसदारांकडून कागदपत्रे गोळा केली. जिल्हा रुग्णालयातील शवागृहातील डॉ. हेमंत घांगळे व कर्मचार्‍यांनी १२ मृतदेहांचे शवविच्छेदन केले. रविवारी (दि.९) मृत १२ पैकी ९ प्रवाशांचे मृतदेह वारसदारांनी ओळखले. सोमवारी दोन मृतदेहाची ओळख पटली. तर मंगळवारी डीएनएवरुन बारावा प्रवाशी मिनेश इंगळे असल्याचे समोर आले. इंगळे यांचा बस दुर्घटनेत मृत्यू झाला असावा, असा अंदाज तीन नातेवाईकांनी केला होता. त्यानुसार पोलिसांनी मृतासह तीनजणांची डीएनए चाचणी केली. त्यात मृत प्रवाशी मिनेश इंगळे व नातलगांची डीएनए चाचणी करण्यात आला. पोलिसांनी डीएनएसाठी मृत प्रवाशाचे हाड व नातलगांचे रक्ताचे नमुने प्रादेशिक न्यायवैधक वैज्ञानिक प्रयोगशाळेकडे जमा केले होते. अखेर सोमवारी रात्री पोलिसांनी ओळख पटल्यानंतर इंगळेंचा मृतदेह वारसदारांना देण्यात आला.

- Advertisement -
अशी आहेत मृत प्रवाशांची नावे

अजय ऊर्फ शंकर मोहन कुचनकर (वय १६, रा. नारेगाव, ता. वर्णी क्रज, जि. यवतमाळ), उद्धव पंढरी भिवंग (वय ५५, रा. तरवडी, ता. मालेगाव, जि. वाशीम), पार्वती ऊर्फ लक्ष्मीबाई नागूराव मुधोळकर (५०, रा. बिबी, ता. लोणार, जि. बुलढाणा), कल्याणी आकाश मुधोळकर (रा. बिबी, ता. लोणार, जि. बुलढाणा), साईल जितेंद्र चंद्रशेखर (रा. सावळी, ता. जि. वाशीम), ब्रम्हदत्त सोगाजी मनावर (४२, रा. पोहरादेवी, ता. मानोरा, जि. वाशीम), वैभव वामन भिलंग (२३, रा. तरवडी, पो. केनवड, ता. मालेगाव, जि. वाशीम), अशोक सोपान बनसोड (५८, रा. बेलरवेडा, ता. रिसोड, जि. वाशीम), सुरेश लक्ष्मण मुळे (५०, रा. बोरगडी, ता. पुसद, जि. यवतमाळ)., हरिभाऊ तुकाराम भिसनकर (वय २८, रा. पाटखेड, जि. यवतनाळ), गजानन शालिकराम लोणकर (वय २३, रा. आसेगाव, जि. वाशीम), मिनेश यादव इंगळे (रा. वसरी, ता. मालेगाव, जि. वाशीम).

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -