घरक्राइमरिक्षात महिलेची रोकड, दागिन्याची पर्स लंपास

रिक्षात महिलेची रोकड, दागिन्याची पर्स लंपास

Subscribe

रिक्षातून प्रवास करताना दोन महिलांनी एका महिलेची रोकड व दागिने असलेली पर्स लंपास केल्याची घटना संभाजी चौक ते दत्त मंदिरस्टॉप, मुंबई नाका येथे घडली. याप्रकरणी प्राजक्ता सोनजे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अनोळखी दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, प्राजक्ता सोनजे संभाजी चौक ते दत्त मंदिरस्टॉपदरम्यान रिक्षातून प्रवास करत होत्या. त्यावेळी रिक्षात त्यांच्याशेजारी दोन महिला बसल्या होत्या. त्यांची नजर चुकवून महिलांनी पर्स लंपास केली. पर्समध्ये दागिने व रोकड होती. पुढील तपास पोलीस हवालदार रोहिदास सोनार करत आहेत.

चोरट्याने कॉलेज रोडला पोत हिसकावली

पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरट्याने हिसकावल्याची घटना कॉलेज रोडवरील साई मंदिरासमोर घडली. याप्रकरणी शोभा इंगळे यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शोभा इंगळे कॉलेज रोडवरुन पायी जात होत्या. त्यावेळी दुचाकीवरुन अनोळखी एकजण त्यांच्याजवळ आला. काही समजण्याच्या आतच त्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक काकविपुरे करत आहेत.

मखमलाबादमध्ये दोघांनी केली एकाला मारहाण

किरकोळ कारणातून दोघांनी एकाला शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना सुयोजित गार्डनजवळ, हॉटेल बार ओ बारसमोर, मखमलाबाद येथे घडली. याप्रकरणी रुद्रप्रताप आहेर यांनी म्हसरुळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित मयुर गोरडे, निलेश रकीबे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, संशयित दोघांनी संगनमताने रुद्रप्रताप आहेर यांना कॉल करुन सुयोजित गार्डनजवळ बोलावले. त्यानुसार ते गार्डनजवळ आले. तू दोन वर्षांपूर्वी विवेक काटेशी भांडण का केले होते. भाई झाला काय, असे म्हणत दोघांनी त्यांना शिवीगाळ व मारहाण केली. त्यात ते जखमी झाले. पुढील तपास पोलीस हवालदार पवार करत आहेत.

- Advertisement -

सोसायटीच्या पार्किंगमधून दुचाकी लंपास

दुचाकीमालकाच्या गैरहजेरीत चोरट्याने दुचाकी लंपास केल्याची घटना जय मंगलमूर्ती सोसायटी, श्रीरंगनगर, गंगापूर रोड येथे घडली. याप्रकरणी विजय बनकर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, विजय बनकर यांनी सोसायटीच्या पार्किंगमध्ये दुचाकी पार्क केली होती. त्यांच्या गैरहजेरीत चोरट्याने दुचाकी लंपास केली. पुढील तपास पोलीस हवालदार आहिरे करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -