वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी झेडपी शाळेत बालसाहित्य देवाण-घेवाण उपक्रम

नाशिक : जिल्ह्यातील 15 तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळेत नाशिक जिल्हा ग्रंथालय विकास कार्यक्रमची अंमलबजावणी संचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या मान्यतेनुसार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नाशिक, जिल्हा परिषद नाशिक आणि रूम टू रीड यांचे संयुक्त विद्यमाने सुरू आहे. या कार्यक्रमामार्फत प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करून स्वतंत्र वाचक बनविले जात आहे. सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये बालसाहित्याची देवाण-घेवाण उपक्रम घेतले जात आहेत.

नवीन शैक्षणिक धोरण-2020 नुसार निपुण भारत मिशन अंतर्गत प्राथमिक इयतेच्या मुलांमध्ये पायाभूत भाषिक साक्षरता कौशल्य म्हणजे मौखिक भाषा विकास, ध्वनी जागरुकता, निसांकेतीकरण, शब्दसंग्रह, वाचन आकलन, वाचन प्रभुत्व, चित्राविषयी संकल्पना, लेखन आणि वाचन संस्कृतीचे विकास करण्याचे उद्देश आहे. उद्देशीत कौशल्याचे विकास घडवून आणण्यास बालस्नेही वाचनालय आणि बालवाचनालयातील उपलब्ध मुलांच्या वयानुरूप योग्यतेचे आणि गुणवत्तापूर्ण विविध बालसाहित्याची भूमिका महत्वाची आहे. नाशिक जिल्हा ग्रंथालय वाचन विकास कार्यक्रम ह्या भाषिक कौशल्याचा विकास करण्यामध्ये शाळेंना सहाय्यक ठरत आहे.

नाशिक जिल्हा ग्रंथालय विकास कार्यक्रम अंतर्गत बागलाण तालुक्यातील एकूण 21 केंद्र स्तरीय ग्रंथालयद्वारे सर्व जिल्हा परिषद शाळेत बालसाहित्याची देवाण-घेवाण केली जात आहे आणि वाचन उपक्रम घेतले जात आहेत.
18 आणि 19 जुलै 2022 रोजी बागलाण तालुक्यात नाशिक जिल्हा ग्रंथालय विकास कार्यक्रम अंतर्गत प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नाशिक आणि जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद नाशिक यांचे मार्गदर्शनेखाली दोन दिवसीय उजळणी प्रशिक्षण बागलाण पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी चित्रा देवरे व शिक्षण विस्तार अधिकारी विजय पगार यांच्या प्रमुख उपस्थितीत गट साधन केंद्र बागलाण येथे यशस्वीपणे पार पडले. या प्रशिक्षणामध्ये तालुक्यातील विस्तार अधिकारी, 15 केंद्रप्रमुख, 24 केंद्रस्तरीय ग्रंथालय साधनव्यक्ती आणि विषय साधन व्यक्ती उपस्थित होते. या प्रशिक्षण कार्यक्रमात रूम टू रीडचे कार्यक्रम सहाय्यक कांचन भस्मे, कार्यक्रम सहाय्यक माधव आव्हाड, चांदवड तालुका समन्वयक सुशील पठारे, पेठ तालुका समन्वयक अंकित मोहिते, बागलाण तालुका समन्वयक रुपेश पाटील यांनी सत्र घेतले.