घरमहाराष्ट्रनाशिकरिक्षा चालवून ‘चित्रा‘ बनली पहिली बसचालक

रिक्षा चालवून ‘चित्रा‘ बनली पहिली बसचालक

Subscribe

चांदवड तालुक्यातील वडाळीभोई सारख्या ग्रामीण भागातून चित्रा रामराव शेळके यांनी प्रतिकूल परीस्थीतीवर मात करत महाराष्ट्रातील पहिल्या महिला बसचालक होण्याचा बहुमान मिळवला आहे.

चांदवड तालुक्यातील वडाळीभोई सारख्या ग्रामीण भागातून चित्रा रामराव शेळके यांनी प्रतिकूल परीस्थीतीवर मात करत महाराष्ट्रातील पहिल्या महिला बसचालक होण्याचा बहुमान मिळवला आहे. ग्रामीण भागातून येऊन नवी मुंबईत गगनभरारी घेत महिलांसमोर प्रेरणादायी आदर्श ठेवला आहे.

वडाळीभोई येथील शेतकरी कुटुंबात चित्रा यांचा जन्म झाला. वडील बबन शिर्के हे शेतकरी. चित्रा यांचे शिक्षण जेमतेम बारावीपर्यंत झाल्यावर २००२ मध्ये मानोरी बुद्रुक (ता. येवला) येथील रामराव किसन शेळके यांचेशी विवाहबद्ध झाल्या. यानंतर चित्रा शेळके यांनी ऐरोली, नवी मुंबई येथे २०१४ मध्ये पती रामराव यांना विश्वासात घेत महिलांना दैनदिन प्रवासासाठी येणार्‍या अडचणी तसेच विविध समस्या समजावत यावर मार्ग म्हणून स्वतः रिक्षा चालवण्याचा आग्रह धरून रिक्षा चालक होऊन महिलांना सेवा देण्याचा निश्चय चित्रा यांनी केला. यासाठी पती रामराव यानी देखील पत्नी चित्राच्या भावनांचा आदर करत तिच्या निश्चयाला समर्थ साथ देत सुरवातीस स्वताच्या मार्गदर्शनाखाली रिक्षा चालवणे शिकविले. दोन ते अडीच वर्षे नवी मुंबई ऐरोली येथे रिक्षा लाईनमध्ये काम करताना २०१५ मध्ये कंडक्टरचा भरलेला नोकरी अर्जाचा कॉल २०१६ मध्ये आला. तेथे मुलाखत दिल्यावर निवड झाली. वाहक म्हणून नियुक्ती झाली तरी पार्ट टाइम म्हणून रिक्षा चालवली. वाहकाचे काम करताना बस ड्रायव्हींगचा विचार आला. बसचालक झाले तर स्वतः स्कुल बस घेऊ, यासाठी टेस्ट देण्यापुरते हेवी लायसन्स काढून ठेवले. योगायोगाने महिला बसचालक पाहिजे, अशी जाहिरात प्रसिद्ध झाली. २०१६ मध्ये बसचालक पदाचा अर्ज भरला, मुलाखतही दिली. ट्रॉफीकमध्ये मोठी गाडी चालवली नसल्याने मोठी कसरत करावी लागली. बसचालक सिलेक्शन झाले तेव्हा ४० पुरूष व एकट्या महिला बसचालक होती ती म्हणजे चित्रा शेळके. यावेळी प्रशिक्षक अब्दुल काझी यांनी वेळोवेळी प्रेरणा देत बसचालकाचे शिक्षण यशस्वी दिले. यामुळे महाराष्ट्रातील पहिली महिला बसचालक होऊ शकले, असे चित्रा शेळके सांगतात.

- Advertisement -

विविध पुरस्काराने सन्मान

सध्या तुर्भे डेपोत तेजस्विनी बसचालक म्हणून कार्यान्वित आहेत. रिक्षाने हक्काचा रोजगार उपलब्ध झाला, याचा अभिमान आहे. ८ मार्च २०१९ रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ठिकठिकाणी गौरव होऊन पुरस्कार देण्यात आले त्यात स्त्री सन्मान पुरस्कार ,राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले समाजभूषण पुरस्कार २०१९, स्त्री सन्मान पुरस्कार मुलुंड – ऐरोली (नवी मुंबई ) आदी अनेक पुरस्कार व गौरवाने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे.

ध्येयाचा पाठलाग सुरूच ठेवला

समस्यांवर मात करत चित्राने ध्येयाचा पाठलाग सुरूच ठेवला. चित्रा हे सर्व करत असताना मी व आई सत्यभामा, मुलगी धनश्री, मुलगा अलोक, असे सर्व कुटुंब समर्थपणे तिच्या पाठीशी उभे राहिलो. मला चालवता येत नसलेली बस मात्र, पत्नी चित्रा जेंव्हा मुंबईच्या गर्दीतून ऐटीत चालवते तेंव्हा छाती अभिमानाने फुलते. – रामराव शेळके, चित्राचे पती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -