घरमहाराष्ट्रनाशिकनवीन नाशिकमध्ये अतिक्रमणांचा कळस; तक्रारींकडे कानाडोळा करत महानगरपालिकेची मुकसंमती?

नवीन नाशिकमध्ये अतिक्रमणांचा कळस; तक्रारींकडे कानाडोळा करत महानगरपालिकेची मुकसंमती?

Subscribe

नाशिक : पालिकेच्या विभागीय कार्यालयाच्या हद्दीत, रहदारीची वर्दळ असणार्‍या मुख्य रस्त्यांवर नियमांचे उल्लंघन करत अनधिकृत भाजीबाजार थाटण्यात आले आहेत. शेकडो फेरीवाले व्यावसायिक भररस्त्यात ठाण मांडून असलेले असताना नगरचना व अतिक्रमण निर्मूलन विभाग मात्र संबंध जपण्यावर लक्ष्य केंद्रित करत असल्याचे चित्र आहे. प्रशासनाच्या अशा कारभारामुळे नवीन नाशिकमध्ये अतिक्रमणांचा कळस तयार झाला आहे.

पवननगर, शिवाजी चौक येथे तर भाजीमार्केट तयार केलेले असूनही, मार्केटबाहेर व पार्किंगच्या जागेवरही भाजीपाला व फळ व्यावसायिकांनी आपले बस्तान बसविल्याने खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना आपली वाहने रस्त्यावर लावावी लागत असल्याने येथील वाहतूक कोंडी रोजचीच डोकेदुखी झालेली आहे. भाजीमार्केट व व्यावसायिक बाजारपेठ तसेच वाहतुकीचा मुख्य रस्ता असल्याने या भागातून पायी चालणेही अवघड होते. त्यातच पोलीस प्रशासन किंवा वाहतूक शाखेकडूनही वाहतूक कोंडीवर नियंत्रणासाठी उपाययोजना केली जात नसल्याने नागरिक व वाहनचालकांना दररोजच तारेवरची कसरत करावी लागते. परिणामी या भागांमध्ये लहान-मोठे अपघात, त्यातून होणारी भांडणे, वादावादीचे प्रकारही नित्याचेच झाले आहेत. पालिकेने ठिकठिकाणी हॉकर्स झोन, फेरीवाला क्षेत्र तयार केलेले आहे. मात्र, परिसरात हजारो विक्रेते नियमांचे उल्लंघन करीत भररस्त्यात विनापरवानगी व्यवसाय करीत आहेत. मिळकत विभागाचे कर्मचारी या हॉकर्सकडून अधिकृत हप्ते गोळा करतात.

- Advertisement -

मूळ प्रश्न सोडून पालिकेचे इतरत्र लक्ष्य

महापालिका वाहतुकीला अडथळा ठरणार्‍या अतिक्रमणांकडे मुद्दाम डोळेझाक करत असताना, दुसरीकडे रस्त्यालगत असलेल्या घरांमध्ये व्यवसाय करणार्‍यांच्या जागांची मोजणी करून पालिकेने त्यांना अतिक्रमण केल्यासंदर्भात नोटिसा बजावल्या आहेत. यासंदर्भात पवननगर परिसरातील नोटीस मिळालेल्या व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाने आमदार सीमा हिरे यांच्यासह पालिका आयुक्तांची भेट घेत आपली बाजू मांडली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -