घरताज्या घडामोडी‘रजगति’मधून सत्ता, व्यवस्था, राजनैतिक चरित्र, राजनीतिवर भाष्य

‘रजगति’मधून सत्ता, व्यवस्था, राजनैतिक चरित्र, राजनीतिवर भाष्य

Subscribe

राजकारण घाणेरडे आहे? माझा राजकारणाशी संबंध काय? राजकारण आपले काम नाही? या सार्‍या प्रश्नांना योग्य उत्तरे देणारे आणि आपले सारे जगणेच राजकारणाशी संबंधित आहे, हे सांगणारे, विचार करायला लावणारे नाटक म्हणजे ’राजगति’ हे नाटक आहे. नाटक राजगति भारत देश आणि जगातील विविध राजनैतिक विचारधारांच्या अंतर्विरोधी बाजूला विश्लेेषित करून माणसाच्या कल्याणासाठी त्यांच्या समन्वयाची बाजू अनिवार्य आहे, या मुद्द्याला अधोरेखित करते. जागतिकीकरणाच्या विनाशावर आणि विकासाच्या नावाखाली रचलेले पाखंड यावर नाटकातून प्रहार करण्यात आला.

लोकतंत्र दडपशाहीच्या बेड्यांमध्ये अडकले आहे, अशावेळी समाजातील प्रत्येकाची जाणीव जागृत करून प्रतिरोधासाठी तयार करणे, ही कलेची मुख्य भूमिका आहे. ‘कला माणसाला माणूस बनवते, याच कलात्मक आणि राष्ट्रीय कर्तव्याचे निर्वहन करत ‘थिएटर ऑफ़ रेलेवंस’ नाट्य सिद्धांताचे अभ्यासक आणि रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांनी ‘संविधान संरक्षण, मानवता आणि न्याय’ चेतनेची दृष्टी जागवण्यासाठी नाशिक तीन दिवसीय ‘थिएटर ऑफ़ रेलेवंस नाट्य कुंभ’ आयोजित केला आहे. थिएटर ऑफ रेलेवेंसच्या वतीने शनिवारी (दि.२२) प. सा. नाट्यगृहामध्ये ’राजगति’ या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. कलावंतांच्या दर्जेदार अभिनयाने प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवले.

- Advertisement -

नाटक राजगति जनतेला आपल्या राजनैतिक मुक्तिसाठी चार सूत्र देते ती म्हणजे सत्ता, व्यवस्था, राजनैतिक चरित्र आणि राजनीति. सत्ता नेहमीच भ्रष्ट राहणार मग ती कोणतीही असो किंवा कोणाचीही असो, व्यवस्था आपल्या जडत्वातून कोणत्याही परिवर्तनाला प्रभावहीन बनवते. राजनैतिक चरित्र घडवल्याशिवाय संपूर्ण राजनैतिक प्रक्रिया पाखंडाची शिकार होते. म्हणूनच सत्ता, व्यवस्था, राजनैतिक चरित्र आणि राजनीति या चारही आयामांना एकत्र समजणे अनिवार्य आहे. नाटक राजगति ‘राजनीति’ला पवित्र नीती मानते. जनतेकडून राजनीतिमध्ये विवेकपूर्ण सहभागितेची अपेक्षा करते. राजनीति, सत्ता, व्यवस्था आणि राजनैतिक चरित्राला स्वच्छ करणारी पवित्र नीती आहे.

जागतिकीकरण आणि फॅशिस्टवादी शक्ती स्वराज्य आणि समतेच्या विचारांना उद्धवस्त करुन समाजात विकार निर्माण करतात ज्यामुळे संपूर्ण समाज आत्महीनतेनेग्रस्त होऊन हिंसक होतो. हिंसा मानवतेला नष्ट करते आणि कला मनुष्यात माणुसकीचा भाव जागृत करते, असा संदेश राजगति नाटक सतत देत रहातो. नाटक ‘राजनीती घाण आहे’ या कलंकला मिटवते आणि देशातील प्रत्येक नागरिकांना राजनीतिमध्ये विवेकशील सहभगितेसाठी प्रेरित करते.
रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांनी राजगति नाटकाचे लेखन, दिग्दर्शन केले आहे. प्रकाश संयोजन संकेत आवळे यांनी केले. अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर, कोमल खामकर, तुषार म्हस्के, स्वाती वाघ, प्रियंका कांबळे, सिद्धांत साळवी, मनीष घाग, सुरेखा साळुंखे आणि सचिन गाडेकर यांनी नाटकातील विचार आपल्या अभिनयाने सादर केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -