घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक महापालिकेच्या बजेट मध्ये आयुक्तांची खोटी आश्वासनं

नाशिक महापालिकेच्या बजेट मध्ये आयुक्तांची खोटी आश्वासनं

Subscribe

पाच वर्षांचा पंचनामा : वास्तववादी बजेटची संकल्पना पुसली

नाशिक : निवडणुका तोंडावर आल्या की राजकारणी मंडळी आश्वासनांची खैरात करतात असा सर्वसामान्यांचा ग्रह आहे आणि तसा अनुभवही प्रत्येक निवडणुकीला येतो. विशेषत: महापालिकेचे बजेट सादर करताना सत्ताधारी निवडणुका समोर ठेऊनच घोषणांचा पाऊस पाडतात. प्रत्यक्षात त्यातील बोटावर मोजण्याइतक्याच घोषणांची पूर्तता होते. त्यामुळे प्रशासनाच्या अर्थात महापालिका आयुक्तांच्या बजेटला महत्व प्राप्त होते. हे बजेट वास्तववादी असते असे म्हटले जात असले तरी गेल्या पाच वर्षातील बजेटचा अभ्यास करता, आयुक्तही बजेटमध्ये विविध योजनांची पोकळ आश्वासनेच देत असल्याचे दिसते.

प्रत्यक्षात कृती शून्य.

नाशिककरांच्या भाषेत सांगायचे झाले तर राजकीय मंडळींप्रमाणे आयुक्तही बजेटमध्ये भप्पारेच मारतात. चालू पंचवार्षिकमधील यंदाचे अखेरचे बजेट असल्याने पाच वर्षात आजी-माजी आयुक्तांनी सादर केलेल्या बजेटचा पंचनामा खास ‘आपलं महानगर’च्या वाचकांसाठी !

तुकाराम मुंडे :२०१८-२०१९ 

  • सायकल शेअरिंग प्रकल्प राबवणार (प्रकल्प बासनात गेला)
  • प्लास्टिक मुक्त शहर बनविणार (अजूनही परिस्थिती जैसे थे)
  • पाणी गळती थांबवण्यासाठी अत्याधुनिक प्रणालीचा वापर होणार (अद्याप कार्यवाही नाही)
  • गोदावरी आणि उपनद्यांचे प्रदूषण दूर करणार (अद्याप परिस्थिती जैसे थे) मनपा शाळा डिजीटल होणार (काहीच शाळा डिजीटल)
  • व्हर्च्युअल क्लासरुमच्या माध्यमातून सर्व शाळा एकमेकांना जोडणार (प्रस्तावच नाही)
    दिव्यांगासाठी विशेष शाळा स्थापन करणार (प्रस्तावच नाही)

राधाकृष्ण गमे : २०१९-२०

  • पेलीकन पार्कच्या १७ एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्यान विकसित करणार
    (अद्याप काम बाकी)
  • दिव्यांगासाठी पूर्व विभागात १७ कोटी खर्चाचे प्रशिक्षण केंद्र (प्रस्ताव नाही)
    कृषीनगर येथे ९०० मीटर लांबीचा सायकल ट्रॅक
    (प्रस्ताव नाही)
  • पंचवटी, गंगापूर रोड आणि नाशिकरोडला नाट्यगृह (प्रत्यक्षात कामाला
    सुरुवात नाही)
  • पंचवटीत महिलांसाठी ५२६० चौरस मीटर जागेत उद्योग भवन बांधणार
    (कामाला सुरुवात नाही)
  • गोदावरीसह उपनद्यांमधील वहनक्षमता वाढविणार
    (अजूनही कृती नाही)
  • १२६ अंगणवाड्यांचे बांधकाम (प्रस्ताव नाही)
  • शिवाजी उद्यानाचे नूतनीकरण (कृती नाही)

राधाकृष्ण गमे : २०२०-२०२१ 

  • हरीत क्षेत्र विकास प्रकल्पातील उड्डाणपुलासह नवीन पूल व अन्य पायाभुत सुविधांसाठी खर्च (काम बाकी)
  • महापौरांच्या रामायण बंगल्याजवळ १२ मजली नवीन इमारत; पहिल्या टप्प्यात दुमजली काम (प्रस्तावच नाही)
  • पंचवटीत महिलांसाठी नवीन जलतरण तलाव (काम बाकी)
  • गंगापूररोड, आडगावला नवीन व्यावसायिक संकुल बांधणार (प्रस्तावच नाही)
  • रस्ते व चौकांचे ट्रॅफिक ऑडिट करणार (प्रस्तावच नाही)
  • सातपूरमध्ये महिलांसाठी जलतरण तलाव (काम बाकी)
  • पालिकेच्या शाळांत एक सॅनिटरी नॅपकिन मशिन व डिस्पोजल मशिन (काहीच शाळांना सुविधा)

कैलास जाधव : २०२१-२२

  • नाशिक पूर्व विभागाच्या कार्यालयासाठी बांधण्यात येणार प्रशासकीय इमारत
    (कामास सुरुवात नाही)
  • गंगापूर रोड येथे सर्वे क्रमांक ४५० येथे नाट्यगृह बांधण्याचा प्रस्ताव (प्रस्तावच नाही)
  • नवीन नाशिकमधील सर्वे क्रमांक २१९ मध्ये महिलांसाठी जलतरण तलाव (प्रस्तावच नाही)
  • वसंत कानेटकर उद्यानाचे होणार नूतनीकरण (काम अर्धवट)
  • गोदावरी परिचय उद्यानाचे नूतनीकरण (प्रस्ताव नाही)
  • सर्वच सिग्नल्सवर सीसी कॅमेरे (प्रस्ताव नाही)
  • शुद्ध हवा कृती योजनेंतर्गत प्राप्त २० कोटींच विद्युत शवदाहिनी, धुलीकरण कमी करण्यासाठी यांत्रिकी पद्धतीचे झाडू आदींचा वापर करण्यात येईल (काम बाकी)
  • पंचवटी, नवीन नाशिक आणि नाशिकरोड विभागात विद्युत शवदाहिनी उभारणार
    चुंचाळे येथे साकारणार वनउद्यान (प्रस्ताव बाकी)
  • महापालिका शिक्षकांचा कौशल्य विकास करुन स्मार्ट स्कूल तयार करणे (प्रस्तावच नाही)
  • माध्यमिक विद्यालयातील मुलींसाठी सायकल खरेदी (प्रस्तावच नाही)

कैलास जाधव : २०२२-२३

  • बिटको रूग्णालयात पदव्युत्तर शिक्षणक्रम सुरू करणार
  • प्रत्येक प्रभागात सीबीएसई धर्तीवर एक शाळा सुरू करणार
  • बीओटी तत्वावर महापालिका करणार मिळकतींचा विकास
  • आयटी पार्कची उभारणी
  • बांधकाम व्यवसायिकांना इलेक्ट्रिक वाहनचार्जिंग स्टेशन बंधनकारक करणार
  • शहराचे ड्रोनव्दारे सर्वेक्षण करुन मॅपिंग करणार
  • सीबीएससी शाळांच्या धर्तीवर पालिका शाळा सुरु करणार
    स्मार्ट स्कूलसाठी १५ कोटींची तरतूद
नाशिक महापालिकेच्या बजेट मध्ये आयुक्तांची खोटी आश्वासनं
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -