घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रअंबड एमआयडीसीत स्वतंत्र पोलीस ठाणे निर्मिती करा; स्थांनिकांची स्वाक्षरी मोहीम

अंबड एमआयडीसीत स्वतंत्र पोलीस ठाणे निर्मिती करा; स्थांनिकांची स्वाक्षरी मोहीम

Subscribe

नवीन नाशिक : अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत चुंचाळे शिवारातील दत्तनगर, दातीर मळा परिसरात २० ते २५ जणांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टवाळखोरांनी हातात लाकडी दांडके, हत्यारे मिरवत परिसरातील घरांवर दगडफेक तसेच नागरिकांना मारहाण करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. या गंभीर प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने हद्दीत पोलिसांचा धाक राहिलाय की नाही ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शनिवारी रात्रीच्या वेळेस हा प्रकार घडल्यानंतर अंबड ग्रामस्थांनी स्वाक्षरी मोहिमेला सुरवात केली आहे. ही मोहीम पुढील तीन दिवस सुरू राहणार आहे. अंबड औद्योगिक वसाहतीत स्वतंत्र पोलीस ठाणे असावे अशी प्रमुख मागणी नागरीकांकडून केली जात आहे.

यावेळी अंबड औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याच्या गेल्या अनेक वर्षांपासून करीत असलेल्या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी तसेच गुंडांवर कठोर कारवाई करून त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, या मागणीसाठी मुंबई येथे मंत्रालयावर नाशिक ते मुंबई पायी मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisement -

अंबड औद्योगिक वसाहतीसह दत्तनगर परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला असून, यामुळे रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी याच परिसरात एका सामान्य कुटुंबाच्या घरात घुसून गर्भवती महिलेला पोटात लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्याचा प्रकार घडला होता. अशा घटनांनी परिसरातील महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून महिलांचे घराबाहेर निघणे देखील जिकरीचे झाले आहे. याशिवाय परिसरात दारूसह
अंमली पदार्थांची सर्रासपणे विक्री होत असल्याने या परिसरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या सर्व प्रकारांना तात्काळ आळा घालण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान यावेळी माजी नगरसेवक राकेश दोंदे, साहेबराव दातीर, रामदास दातीर, अमोल दातीर, अरुण दातीर आदींसह ग्रामस्थ, व्यावसायिक, उद्योजक उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -