घरताज्या घडामोडीमढच्या 2 स्टुडिओंवर पालिकेचा हातोडा; मालक कागदपत्रे सादर करण्यास असमर्थ

मढच्या 2 स्टुडिओंवर पालिकेचा हातोडा; मालक कागदपत्रे सादर करण्यास असमर्थ

Subscribe

मालाड, मढ, मार्वे, एरंगळ, भाटी या भागात २०२१ व २०२२ या कालावधीत एनडीझेड आणि सीआरझेडचे उल्लंघन करत उभारण्यात आलेल्या ४९ अनधिकृत स्टुडिओंपैकी मिलेनियर व एक्स्प्रेशन या दोन स्टुडिओंवर पालिकेच्या पी/ उत्तर विभागाच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात मंगळवारी तोडक कारवाई करून स्टुडिओ जमीनदोस्त केले.

मुंबई : मालाड, मढ, मार्वे, एरंगळ, भाटी या भागात २०२१ व २०२२ या कालावधीत एनडीझेड आणि सीआरझेडचे उल्लंघन करत उभारण्यात आलेल्या ४९ अनधिकृत स्टुडिओंपैकी मिलेनियर व एक्स्प्रेशन या दोन स्टुडिओंवर पालिकेच्या पी/ उत्तर विभागाच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात मंगळवारी तोडक कारवाई करून स्टुडिओ जमीनदोस्त केले. त्यामुळे इतर अनधिकृत स्टुडिओ चालकांचे धाबे दणाणले असून या कारवाईने परिसरात खळबळ उडाली आहे. (Mumbai bmc break 2 studios of Madh Owner unable to submit documents)

५० हजार चौरस फुट जागेतील बालाजी स्टुडिओचे मालक न्यायालयात गेल्याने ते प्रकरण न्यायप्रविष्ट असून त्याबाबत न्यायालयाकडून अंतिम निकाल लागल्यावर आवश्यक ती योग्य कार्यवाही करण्यात येणार आहे. यासंदर्भातील माहिती पी/ उत्तर विभागाचे साहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.

- Advertisement -

मढ, मार्वे, मालाड येथील अनधिकृत स्टुडिओ उभारणी प्रकरणात चार आठवड्यात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी दिले आहेत. मालाड, मढ, मार्वे येथे जवळजवळ ४९ बेकायदा स्टुडिओ उभारून त्याद्वारे एक हजार कोटींचा घोटाळा करण्यात आला आहे.

या स्टुडिओ उभारणीला माजी मंत्री अस्लम शेख व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचे आशीर्वाद लाभले आहेत, असे गंभीर आरोप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वीच केले होते. तसेच, या प्रकरणाची चौकशी करून कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पालिकेकडे केली होती. त्याची गंभीर दखल घेऊन पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी, मढ, मार्वे, मालाड येथील अनधिकृत स्टुडिओ उभारणी प्रकरणात चार आठवड्यात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनाला नुकतेच दिले होते.पालिका आयुक्त चहल यांनी उपायुक्त हर्षद काळे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून सदर प्रकरणी चौकशी होणे व अहवाल येणे बाकी आहे.

- Advertisement -

मालाड, मढ, मार्वे, एरंगळ, भाटी या भागात २०२१ आणि २०२२ या कालावधीत एनडीझेड आणि सीआरझेडचे उल्लंघन करून तब्बल ४९ अनधिकृत स्टुडिओ उभारण्यात आले. या स्टुडिओ व्यवसायाच्या आड तब्बल एक हजार कोटींचा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप भाजपचे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. या प्रकरणी किरीट सोमय्या यांनी २३ ऑगस्ट रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून तक्रार करीत चौकशी व कारवाईची मागणी केली होती. तसेच, भाजपतर्फे स्टुडिओच्या परिसरात आंदोलनही करण्यात आले होते. तसेच, पालिकेकडे तक्रार करण्यात आली होती.

वास्तविक, या स्टुडिओंना तात्पुरते शेड आणि सेट बनवण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र, या परवानगीच्या नूतनीकरणीसाठी महाराष्ट्र सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधीकरण (एमसीझेडएमए) आणि पर्यावरण विभागाकडून मिळालेली परवानगी महापालिकेला सादर करा, असे आदेश पालिकेच्या पी/उत्तर विभागाने दिले होते. मात्र, नूतनीकरणासाठी आवश्यक असलेली परवानगी सादर न केल्यामुळे जिल्हा सागरतटीय नियंत्रण समिती अध्यक्ष व जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार महापालिकेच्या पी/उत्तर विभागाने मंगळवारी तोडक पथकाद्वारे मिलेनिअर्स आणि एक्सप्रेशन्स स्टुडिओवर कारवाई करून ते जमिनदोस्त केले.


हेही वाचा – गणेशोत्सवात रात्र बससेवेतून बेस्टला साडेचार लाखांची कमाई

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -