घरमहाराष्ट्रनाशिकक्रेडाई नाशिक मेट्रोला राष्ट्रीय, राज्य प्रतिनिधीत्व

क्रेडाई नाशिक मेट्रोला राष्ट्रीय, राज्य प्रतिनिधीत्व

Subscribe

अनंत राजेगावकर राष्ट्रीय कोषागारपदी, तर जितेंद्र ठक्कर सल्लागार समिती अध्यक्षपदी

क्रेडाईची राष्ट्रीय व राज्यस्तरीय कार्यकारिणी पुणे येथे झालेल्या सर्वसाधारण सभेत करण्यात आली. यात क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पुण्याचे सतीश मगर यांची तर राष्ट्रीय चेअरमनपदी अहमदाबादचे जक्षय शहा यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रीय कार्यकारिणीत क्रेडाई नाशिकचे माजी अध्यक्ष अनंत राजेगांवकर यांची कोषागार पदावर नियुक्ती झाली. तसेच क्रेडाई नाशिकचे माजी अध्यक्ष जितेंद्र ठक्कर यांची राष्ट्रीय सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी तसेच घटना समितीचे अध्यक्ष व विशेष निमंत्रित या पदांवर नियुक्ती करण्यात आली.

२०१९ ते २०२१ पर्यंतची कार्यकारिणी यावेळी जाहीर करण्यात आली. राष्ट्रीय अध्यक्षांच्या मुख्य समितीत क्रेडाईचे नाशिकचे माजी अध्यक्ष सुनील कोतवाल यांची नियुक्ती झाली. दिल्ली येथे  १३ व १३ फेब्रुवारीस पार पडलेल्या युथकॉन २०१९ परिषदेमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्रेडाईच्या वतीने श्वेतपत्रिका सादर करण्यात आली होती. त्या श्वेतपत्रिकेची अंमलबजावणी करण्यासाठी समन्वयक म्हणून क्रेडाई नाशिकचे कार्यकारिणी सदस्य गौरव ठक्कर यांची नियुक्ती करण्यात आली.

- Advertisement -

क्रेडाई महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी कोल्हापूरचे राजीव पारीख यांची निवड झाली, तर नाशिकचे सुनील कोतवाल यांची मानद सचिव या पदावर पुनर्नियुक्ती झाली. नाशिकचे विद्यमान अध्यक्ष उमेश वानखेडे यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रॉपर्टी प्रदर्शन समिती समन्वयकपदाचा कार्यभार सोपविण्यात आला तर क्रेडाई नाशिकचे युथविंगचे समन्वयक निशीत अटल यांच्याकडे महाराष्ट्राच्या युथविंगचे सहसमन्वयकपदाचा कार्यभार सोपविण्यात आला. कार्यक्रमाला क्रेडाई नॅशनलचे मावळते चेअरमन गितांबर आनंद, जक्षय शहा तथा संपूर्ण भारतातील क्रेडाईचे पदाधिकारी व सदस्य तसेच विविध क्षेत्रातील उद्योगपती, मान्यवर तसेच सरकारी सनदी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्रेडाई नाशिकमधून जितेंद्र ठक्कर, अनंत राजेगांवकर, सुनील कोतवाल, उमेश वानखेडे, रवी महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -