घरताज्या घडामोडीदुचाकी न दिल्याने युवकावर चाकूहल्ला

दुचाकी न दिल्याने युवकावर चाकूहल्ला

Subscribe

दुचाकी न दिल्याच्या कारणावरुन तिघांनी एकास बेदम मारहाण करत चाकूने वार केल्याची घटना शुक्रवारी (दि.8) सायंकाळी टाकळीरोड परिसरातील पंचशीलनगर येथे घडली. याप्रकरणी गणेश जगदीश भालेराव (22, समतानगर, टाकळीरोड) यांनी उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रेम सुधाकर पवार (सर्वजण रा.समतानगर, टाकळी रोड), अनिकेत पगारे, आकाश दाणी अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, भालेराव शुक्रवारी सायंकाळी मित्रांसमावेत गप्पा मारत होते. त्यावेळी तिघेजण गणेशच्या जवळ आले. दुचाकी का दिली नाही, असे म्हणत तिघांनी त्यास बेदम मारहाण करत चाकूने वार केले. त्यात तो जखमी झाला. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक गवळी करत आहेत.

ट्रक्टरच्या धडकेत पोलीस जखमी

भरधाव ट्रक्टरने दिलेल्या धडकेत पोलीस जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि.8) दुपारी दिंडोरी रोडवर म्हसरूळजवळ घडली. याप्रकरणी ट्रक्टर चालकाविरोधात म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुंडलिक पांडुरंग बागुल (35,रा. प्रभातनगर, म्हसरूळ, नेमणुक मुंबईनाका पोलीस ठाणे) असे जखमीचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, पुंडलिक बागुल शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास कर्तव्यावरून घरी जात असताना दिंडोरी रोडवर म्हसरूळमधील धर्मानंद अपार्टमेंट समोर भरधाव ट्रक्टर (एमएच 04, इबी 427)ने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात ते जखमी झाले. पुढील तपास सहायक पोलीस निरिक्षक जाधव करत आहेत.

- Advertisement -

गळफास घेऊन एकाची आत्महत्या

राहत्या घरी गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी एकलहरा कॉलनी परिसरात घडली. आतमहत्या करण्यामागचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. सचिन संदेश सातारकर (38, रा. एकलहार कॉलनी) असे आत्महत्या करणार्‍या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सातारकर यांनी राहते घरातील सिलिंग फॅनला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही कुटुंबियांना समजताच रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करत त्यांना मृत घोषित केले. पुढील तपास पोलीस हवालदार उजागरे करत आहेत.

वाहनाच्या धडकेत महिला ठार

भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि.8) सायंकाळी पंचवटीतील शरदचंद्र पवार मार्केटयार्ड परिसरात घडली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अनोळखी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहिबाई बंडु रनमाळे (40, रा.हमालवाडी, पेठरोड, पंचवटी) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास राहिबाई रनमाळे शरदचंद्र मार्केटयार्ड येथे रस्ता ओलांडत होत्या. त्यावेळी भरधाव वेगाने आलेल्या वाहनाने त्यांना धडक दिली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक फरार झाला. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक एस. सी. कासर्ले करत आहेत.

- Advertisement -

महिलेची आत्महत्या

राहत्या घरी विषारी औषध सेवन केलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील वंजारवाडी येथे शुक्रवारी (दि.8) पहाटे घडली. आत्महत्या करण्यामागचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अनिता विनायक मसळे (24, रा. वंजारवाडी, ता. नाशिक) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मसळे यांनी 14 एप्रिल रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास राहते घरी विषारी औषध सेवन केले होते. ही बाब कुटुबियांना समजताच त्यांना तातडीने धामणगाव येथील खासगी रूग्णालय दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारार्थ जिल्हा रूग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना शुक्रवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. पुढील तपास सहायक निरीक्षक शेळके करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -