घरमहाराष्ट्रनाशिककांद्यापेक्षा काकडी महाग

कांद्यापेक्षा काकडी महाग

Subscribe

भाजीपाल्याचे दर घसरले

नाशिक :  नवीन वर्षात तापमानाच्या पार्‍यासोबत भाजीपाल्याचे दरही घसरले आहेत. किरकोळ बाजारात कांदा २० रुपये किलो तर, काकडी 50 रुपये किलो दराने विकली जात आहे. त्यामुळे कांद्यापेक्षा काकडी महाग झाली आहे.

मेथी, कोथंबीर, पालक, शेपूची जुडी १० रुपयांना मिळते. तर वांगे, दीलके, दोडके १५ रुपये पावशेर मिळत आहेत. सद्यस्थितीला काकडी सोडली तर सर्वच भाजीपाला सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्यात आहे. किरकोळ बाजारात काकडी ५० रुपये किलो दराने मिळते. कांदे २५ रुपये किलो दराने विकले जात असले तरी दोन किलो किंवा त्यापेक्षा अधिक कांद्याची खरेदी केली तर २० दराने कांदे लाल कांदे मिळतात.

- Advertisement -

घाउक बाजारात कांद्याचे दर १० ते १५  रुपयांवर आल्यामुळे किरकोळ बाजारातही कांद्याचे दर घसरले आहेत. बीट १०  रुपयांना चार मिळतात. डिंगरी, भेंडी, कोबी, शिमला हे देखील १० ते १५  रुपये पावशेर आहेत. टोमॅटो १०  ते १५  रुपये किलो प्रमाणे मिळतात. गेल्या दोन महिन्यांपासून टोमॅटोची सुरु झालेली पडझड अजूनही थांबलेली नाही. इतर भाजीपाला स्वस्त मिळत असल्याने फ्लॉवरची मागणी कमी झाली आहे.

गाजर २५ ते ३० रुपये किलो मिळत असल्याने थंडीत गाजर व मुळ्याची मागणी वाढलेली दिसते. मिरची १५ रुपये पावशेर आहे. भरीत करण्यासाठी वापरात येणारे वांगेही १५  ते २०  रुपये पावशेर मिळतात. त्यामुळे दोन वांगी घेतली तर एका भाजीचे काम होते. लसून, आलं आणि कोथंबीरीचे दरही सर्वसामान्यांच्या आवाक्यात असल्याने साधारणत : ३०० ते ४०० रुपयांत पिशवीभर भाजीपाला मिळत असल्याचे दिसून येते.

असे आहेत भाजीपाल्याचे दर

  • भेंडी : १५  रु.(पावशेर)
  • कांदे : २०  रु. (किलो)
  • काकडी : ५०  रु. (किलो)
  • मेथी : १०  रु. (जुडी)
  • कोथिंबीर : १०  रु. (जुडी)
  • वांगे : १५  रु. (पावशेर)
  • पालक : १५  रु. (जुडी)
  • शेपू : १०  रु. (जुडी)
  • कारले : १५  रु. (पावशेर)
  • टोमॅटो : १०  ते १५  रु. (किलो)
  • गाजर : २५ ते ३०  रु. (किलो)
  • बीट : १० रुपयांचे चार
प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -