घरमहाराष्ट्रनाशिकनाशकात कडाका वाढला

नाशकात कडाका वाढला

Subscribe

पारा १० अंशावर;

नाशिक : नाशिकसह जिल्ह्यातील तापमानात दोन दिवसांपासून अचानक घट झाल्याने तापमानाचा पारा १० अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. चार दिवसांपूर्वी थंडीचा पारा १४  अंशावर असताना शुक्रवारपासून कमालीची थंडी जाणवत आहे. शिवाय निफाड परिसरात ७.२ अंश तापमानाची नोंद करण्यात आली.

मागील आठ दिवसांपासून नाशिकसह जिल्ह्यात तापमान कमी अधिक प्रमाणात वाढत असल्याने थंडीने काढता पाय घेतल्याचे नागरिकांचे म्हणणे होते. कधी १५, कधी १४ तर, कधी १६ अंशांवर तापमानात बदल सुरू होता. त्यामुळे शेकोट्यांचे प्रमाणही कमी झाले होते. मात्र, शुक्रवारी अचानक चार अंशांनी पारा घसरल्याने सकाळपासून हवेत कमालीचा गारवा पसरल्याचे दिसून आले.

- Advertisement -

शुक्रवारी नाशिक शहराचे तापमान १० अंशावर गेले होते. तर, जिल्ह्याचा कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेल्या निफाडला ७.२  अंश तापमानाची नोंद करण्यात आली. त्यामुळे रविवारीदेखील नाशिक शहरासह जिल्ह्यात अचानक प्रचंड थंडी जाणवत होती. सकाळी बाहेर फेरफटका मारणार्‍यांच्या संख्येतही घट झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, दुपारी कडाक्याचे ऊन आणि रात्री थंडी अशा बदलामुळे सर्दी-तापासह संसर्गजन्य आजाराने त्रस्त रुग्णांचे प्रमाण वाढले आहे.

प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -