घरताज्या घडामोडीआत्महत्या करु नका, आमच्याशी संपर्क करा!

आत्महत्या करु नका, आमच्याशी संपर्क करा!

Subscribe

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन सुरु

नाशिक : लॉकडाऊनमुळे अनेक विद्यार्थी हॉस्टेलमध्ये अडकून पडले आहेत. त्यांना आपल्या गावी जात येत नसल्याने त्यांच्यामध्ये उदासिनता वाढली आहे. या कारणास्तव एका विद्यार्थ्यांने नुकतेच आपले जीवन संपवले. आत्महत्या हा काही अंतिम मार्ग नसून विद्यार्थ्यांना नैराश्य आल्यास त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेच्या हेल्पलाईनवर निसंकोचपणे संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. विद्यार्थ्यांनी नैराश्यात येऊन टोकाचे पाऊल उचलू नये. कोणताही विद्यार्थी हा जर उदासिनतेचा सामना करत असेल तर काही समस्या भेडसावत असल्यास विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या मित्र, नातेवाईकांनी अभाविप कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन  जिल्हा संयोजक सागर शेलार यांनी केले. त्यासाठी विद्यार्थ्यांनी 8888533422, 9545055528, 9145106018 या क्रमांकांवर संपर्क साधावा.

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -