घरमहाराष्ट्रनाशिककाँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. तुषार शेवाळे

काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. तुषार शेवाळे

Subscribe

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने तब्बल १७ वर्षांनंतर फेरबदल करत बुधवारी सायंकाळी जिल्हाध्यक्षपदी मविप्रचे अध्यक्ष तथा मालेगावचे प्रथितयश डॉक्टर तुषार शेवाळे यांची नियुक्ती केली.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने तब्बल १७ वर्षांनंतर फेरबदल करत बुधवारी सायंकाळी जिल्हाध्यक्षपदी मविप्रचे अध्यक्ष तथा मालेगावचे प्रथितयश डॉक्टर तुषार शेवाळे यांची नियुक्ती केली. अध्यक्षांच्या निवडीनंतर आता येत्या काही दिवसांत उर्वरित कार्यकारिणीचीही घोषणा होण्याचे संकेत आहेत. त्यात पारंपरिक चेहऱ्यांना धक्का बसण्याची शक्यता वर्तविली जाते आहे.

काँग्रेसच्या वतीने बुधवार, २३ जानेवारीला सायंकाळी ही नियुक्ती जाहीर करण्यात आली. गेल्या १७ वर्षांपासून जिल्हाध्यक्षपदी कायम असलेल्या राजाराम पानगव्हाणे यांना दूर करत काँग्रेसने डॉ. शेवाळे यांच्या रूपाने एक नवा चेहरा दिला आहे. जलव्यवस्थापन आणि सामाजिक कार्यातही डॉ. शेवाळे यांचे भरीव कार्य आहे. अध्यक्षपदाच्या निवडीनंतर आता लवकरच उर्वरित कार्यकारिणीदेखील जाहीर होण्याचे संकेत आहेत. त्यात त्यात पारंपरिक चेहऱ्यांना धक्का बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. केंद्र आणि राज्यात आघाडीचे सरकार असल्यापासून पानगव्हाणे यांच्याकडे जिल्हाध्यक्षपद होते. त्यांच्या कार्यकाळात पक्षाने चांगले आणि वाईट असे दोन्हीही दिवस पाहिले.

- Advertisement -

विश्वास निश्चितच सार्थ ठरवू

पक्षाने दाखवलेला विश्वास आपण निश्चितच सार्थ ठरवू. नाशिक जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची मोट बांधत पक्षाला नवी उर्जा प्राप्त करून देऊ. पक्षाने धुळे लोकसभा मतदार संघातून उमेदवारीची संधी दिल्यास त्याचे सोने करू.
– डॉ. तुषार शेवाळे, नवनियुक्त जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -