घरमहाराष्ट्रनाशिकरात्र झाली तरी वॉटरग्रेसचे 'ते' कर्मचारी अजूनही पालिकेच्या गेटवरच; उपोषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

रात्र झाली तरी वॉटरग्रेसचे ‘ते’ कर्मचारी अजूनही पालिकेच्या गेटवरच; उपोषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Subscribe

नाशिक : नाशिक महानगरपालिकेतील शहर स्वच्छतेचे कंत्राट असलेल्या वॉटरग्रेस प्रोडक्ट्स कंपनीने बेकायदेशीररीत्या काढल्याने उपासमारीचे संकट ओढवलेल्या अन्यायग्रस्त २५० सफाई कामगारांना सनदशीरमार्गाने न्याय मिळवून देण्यासाठी आज सोमवारी (दी.२०) सकाळी ०९.०० वाजेपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व सफाई कामगार त्यांच्या कुटुंबीयांसह नाशिक महानगरपालिकेच्या दारावर ‘आमरण उपोषणास’ बसले आहेत. सकाळपासून सुरू झालेल उपोषण रात्र झाली तरी सुरूच आहे. प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करणार्‍या कामगारांचा तोच उत्साह दिवसभर उपाशी असूनही अद्यापही कायम आहे. मात्र, रास्त मागण्यांसाठी सर्वसामान्य कुटुंबातील तरुण व महिलांच्या आंदोलनाकडे प्रशासनाचे अमानवीय दुर्लक्षामुळे शहरात हळहळही व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, सदर प्रकरणी मनसेच्या नेतृत्वात या सफाई कामगारांनी वारंवार विविध मार्गांनी त्यांच्या समस्या मुख्यमंत्री, पालकमंत्री आदींसह मनपा प्रशासन, पोलीस प्रशासन, न्यायालय आदि स्तरांवर मांडल्या. मात्र, अद्यापही ह्या कामगारांना न्याय मिळाला नसून नाईलाजाने शेवटचा पर्याय म्हणून आमरण उपोषणाचे हत्यार कामगारांनी उपसले आहे.

- Advertisement -

सोमवारी (दी.२०) सकाळी ०९.०० वाजेपासून मनसेच्या नेतृत्वात चार महिन्यापूर्वी कामावरुन काढून टाकलेले किमान ४५०  सफाई कामगार, त्यांच्या नातेवाईकांसह तसेच मनसे पदाधिकारी नाशिक महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर आमरण उपोषणास बसले आहेत. उपोषणाला सुरवात करण्याआधी त्यांनी पालकमंत्री दादा भुसे, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त आदींना माहिती देऊनही याबाबत प्रशासनाला जाग आलेली नाही. असा आरोप मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी केला आहे.

दरम्यान, यावेळी मनसेचे प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, उपाध्यक्ष अॅड. रतनकुमार इचम, कामगार सेनेचे उपाध्यक्ष परशुराम साळवे, शहराध्यक्ष दिलीप दातीर, माजी स्थायी समिती सभापती सलीम (मामा) शेख, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे चिटणीस तुषार जगताप,महिला सेना प्रदेश उपाध्यक्षा सुजाता डेरे, संतोष कोरडे, नितीन माळी, धिरज भोसले, योगेश लबडे, मिलिंद कांबळे, ज्ञानेश्वर बगडे, हरीश गुप्ता, प्रफुल बनभेरू, अक्षरा घोडके, अॅड. महेंद्र डहाळे, विशाल भावले, पंकज दातीर, ललित वाघ यांच्यासह वॉटरग्रेसचे बडतर्फ सफाई कामगार समाधान चव्हाण, गणेश दातीर, किशोर जाधव यांच्यासह २५० कामगार त्यांच्या कुटुंबियांसह वॉटरग्रेसच्या ठेकेदारांच्या अन्यायीकृती विरोधात आमरण उपोषणास बसले आहेत.

- Advertisement -
काय आहे प्रकरण 

चार महिन्यापूर्वी वॉटरग्रेसच्या ठेकेदारांनी काही सफाई कामगारांना मारहाण केल्याचा आरोप करत शहरातील सर्वच कंत्राटी सफाई कामगारांनी कामबंद आंदोलन करत निषेध नोंदवला होता. त्याच दरम्यान, कामगारांची आर्थिक पिळवणूक होत असल्याची बाब समोर आली होती. कामगारांनी यावर जोपर्यंत ठोस उपायोजना होत नाही तोपर्यंत कामावर येणार नाही अशी भूमिका घेतल्याने वॉटरग्रेस ठेकेदाराने टप्प्याटप्प्याने ४५० कामगारांना कामावरुन कमी केले. तेव्हापासून हे कामगार सनदशील मार्गाने आपल्या हक्कासाठी लढत आहेत. विविध स्तरावर त्यांच्या रास्त मागण्यासाठी तसेच त्यांच्या रोजगासाठी पाठपुरावा करत आहेत. मात्र, अद्यापही त्यावर ठोस निर्णय झालेला नाही.

मनपाकडून तांत्रिक कारण पुढे

याबाबत नाशिक महानगरपालिकेचे म्हणणे आहे की, हे सफाई कामगार ठेकेदाराने कंत्राटी पद्धतीने नेमले होते. ठेकेदाराने कोणाला कामावर ठेवायचे किंवा कोणाला बडतर्फ करायचे याचे सर्वस्वी अधिकार ठेकेदारला आहे. यात महानगर पालिका कोणताच हस्तक्षेप करू शकत नाही. तशी तरतूद करारात नाही.

वॉटरग्रेसचा ठेकेदार चेतन बोरा याने बेकायदेशीररित्या आमच्या ४५० कामगारांना कमावरून कमी केले. एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात हे सर्वसामान्यांच सरकार आहे मात्र, कोरोंना काळात शहराला स्वच्छ ठेवण्याच काम ज्या कामगारांनी केल त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे योग्य आहे का?, आम्ही अगदी पालकमंत्री, मनपा आयुक्त, कामगार मंत्री सगळ्यांकडे पाठपुरावा केला तरी अद्याप कोणताच ठोस निर्णय होऊ शकला नाहीये. म्हणून आम्हाला हे उपोषणाचे हत्यार उपसावे लागले. : दिलीप दातीर, शहराध्यक्ष मनसे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -