शाहरुख खान विरोधात चाहता करणार FIR

एका चाहत्याने शाहरुखविरोधात FIR करणार असल्याचे त्याला टिंवटवर सांगितले.

Shah Rukh Khans film pathan gets unprecedented response YRF adds midnight shows

बॉलीवूडचा किंग शाहरुख खान पठाणमुळे पुन्हा चर्चेत आला आहे. पठाणला चाहत्यांनी दिलेल्या पसंतीमुळे शाहरुखने आता टि्वटच्या माध्यमातून फॅन्सशी मनमोकळा संवाद साधताना दिसतोय. मात्र त्याच्या अशाच एका चाहत्याने शाहरुखविरोधात FIR करणार असल्याचे त्याला टिंवटवर सांगितले. त्यावर शाहरुखने दिलेले मजेशीर उत्तर सध्या व्हायरल होत आहे.

शाहरुखचा पठाणमधला हॉट लूक सध्या टर्चेत आहे. पठाणमधला शाहरुखचा सिक्स पॅक लूकने त्याच्या चाहत्यांना संभ्रमात टाकले आहे. वयाच्या ५७ व्या वर्षीही शाहरुखचा हा किलर लूक तरुणांनाही लाजवेल असा आहे. यामुळे एका फॅनने #Asksrk वर शाहरुखचा शर्टलेस फोटो शेअर केला असून त्याखाली त्याने लिहले की खान साहेब मी तुमच्या विरोधात FIR करणार आहे. कारण तुम्ही ५७ वर्षाचे आहात असं खोटं सांगताय. यावर शाहरुखनेही चाहत्याला मजेशीर उत्तर दिल. शाहरुखने चाहत्याच्या टि्वटवर म्हटल की प्लीज मित्रा असं काही करु नकोस. चल ठिक आहे मी मान्य करतो की मी ३० वर्षांचा आहे. आता तर तुला मी खऱ सांगितल. यामुळे मी माझ्या येणाऱ्या चित्रपटाचे नाव जवान अस ठेवणार आहे. शाहरुखच्या या उत्तरावर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.