घरमहाराष्ट्रनाशिकथंडीच्या कडाक्यात शाळांमध्ये विद्यार्थ्यांची अपेक्षित हजेरी

थंडीच्या कडाक्यात शाळांमध्ये विद्यार्थ्यांची अपेक्षित हजेरी

Subscribe

ओमायक्रॉनचा धोका कमी झालेला असताना अचानकपणे आलेल्या थंडीच्या लाटेतही सोमवारी (दि. 24) शाळांमध्ये विद्यार्थ्यांची अपेक्षित हजेरी दिसून आली.
पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे शाळांमध्ये उत्साहात स्वागत करण्यात आले. शहरातील शाळांनी अजूनही सावध पवित्रा घेतलेला दिसून येतो. तर ग्रामीण भागातील शाळा पूर्ण क्षमतेने सुरु झाल्या आहेत. राज्यासह जिल्हाभरात कोरोनाचा कहर वाढल्याने शाळा बंद करण्याचा निर्णय झाला होता. मात्र, शैक्षणिक नुकसान होऊ नये अन चहूबाजूचा विचार करून राज्य शासनाने गत आठवड्यात 24 जानेवारीपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. याच अनुषगांने नाशिक जिल्हा प्रशासनानेही शाळा सुरू करण्याचा आदेश काढला. त्यानुसार सोमवारी शहरासह ग्रामीण भागातील शाळा सुरू झाल्या. रांगोळी, फुग्यांची सजावट करून विद्यार्थ्यांचे स्वागत झाले. तर काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प व औक्षण करून मुलांना प्रवेश देण्यात आला. थंडीचा कडाका जास्त असल्याने विद्यार्थ्यांनी मास्क अन स्वेटर, टोपी घालून शाळेत हजेरी लावल्याचे चित्र बघावयास मिळाले. कोरोनाचा संसर्ग होणार नाही, यादृष्टीनेही विशेष खबरदारी घेतली जात असल्याचे शाळांमध्ये पाहावयास मिळाले. बहुतेक ठिकाणी पालक स्वत: मुलांना शाळेत घेऊन आले होते. विद्यार्थ्यांनी मास्क व सॅनिटायझर यांचा वापर करत सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले. प्रत्येक विद्यार्थ्यांचे थर्मल स्क्रीनिंग करून शाळेत प्रवेश दिला गेला. तर काही शाळांत ऑक्सीमीटरने तपासनी केल्यानंतर मुलांना प्रवेश दिला गेला. बदलत्या वातावरणाचा परिणाम शाळांवर दिसून आला. थंडीचा कडाका जास्त असल्याने शहरातील शाळांमध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची अल्प उपस्थिती दिसून आली. ग्रामीण भागात तुलनेने विद्यार्थ्यांची उपस्थितीती जास्त दिसली.

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -