घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकच्या अभिजीत पार्क येथील वीज वितरणच्या ट्रान्सफॉर्मरला आग

नाशिकच्या अभिजीत पार्क येथील वीज वितरणच्या ट्रान्सफॉर्मरला आग

Subscribe

दोन मांजरांचा मृत्यू; विद्युत कर्मचार्‍यांकडून आगीवर नियंत्रण

नाशिक : येथील अभिजित पार्क कमल नगर कामटवाडे येथे वीज वितरण कंपनीच्या उघड्यावर असलेल्या ट्रान्सफॉर्मरला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. यात दोन मांजरांचा मृत्यू झाला असून शिवसेनेचे पदाधिकारी पवन मटाले यांनी तातडीने वीज वितरण अधिकार्‍यांना घटनेची माहिती देत पाचारण केले. विद्युत कर्मचार्‍यांनी पेटलेल्या आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठी दुर्घटना टळली.

कमलनगरमधील अभिजित पार्क इमारतीजवळ वीज वितरण कंपनीने बसविलेले ट्रान्सफार्मार आहे. हे ट्रान्सफर्मार उघड्यावर असून येथे पुरेशा सुरक्षेची काळजी घेतलेली नाही. याठिकाणी ३ मांजरांची मस्ती सुरू होती. त्यांच्या स्पर्शाने ट्रान्सफॉर्मरजवळ शॉर्ट सर्किट होऊन मोठा आवाज झाला. आगीच्या भडक्याने क्षणार्धात दोन्ही मांजरांचा जळून मृत्यू झाला.

- Advertisement -

दरम्यान, परिसरातील नागरिकांनी पवन मटाले यांना माहिती देताच त्यांनी घटनास्थळी जाऊन विद्युत महावितरण अधिकार्‍यांशी संपर्क साधत त्यांना घटनेची माहिती दिली. विद्युत कर्मचार्‍यांनी ट्रान्सफॉर्मरची आगी वर नियंत्रण मिळविले.
यासंदर्भात नागरिकांनी या पूर्वीही वारंवार तक्रार करून देखील ट्रान्सफॉर्मर भोवती वाढलेले वेल, गवत, काढलेले नाही. तसेच ट्रान्सफॉर्मरला सुरक्षा जाळीदेखील नाही. भविष्यात या ठिकाणी अपघाताचा धोका निर्माण होऊ नये, यासाठी महावितरण कंपनीने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -