घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक महापालिकेचे माजी शहर अभियंता अरुण उमाळे यांचे निधन

नाशिक महापालिकेचे माजी शहर अभियंता अरुण उमाळे यांचे निधन

Subscribe

नाशिक महापालिकेचे माजी शहर अभियंता अरुण उबाळे यांचे बुधवारी दिनांक २० ऑक्टोबर रोजी पहाटे निधन झाले. त्यांच्यावर मुंबई येथे उपचार सुरू होते त्यांना लिव्हरच्या मागे असलेल्या ग्रंथीला (पॅक्रीयाज) गाठ होती. मुंबईतील एका खासगी हॉस्पिटलमध्ये ती शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात आली होती. मात्र त्यानंतर उमाळे यांच्या शारीरिक व्याधी वाढतच गेल्या. त्यांना रक्तदाबाचा त्रास होता. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.

उमाळे यांची कारकीर्द चांगलीच गाजली होती. तत्कालीन शहर अभियंता सुनील खुणे आणि उमाळे यांच्यातील अंतर्गत स्पर्धा नेहमीच चर्चेत रहायची. निवृत्तीनंतर मात्र हे दोन्ही अधिकारी अनेक कार्यक्रमात सोबत दिसायचे. शहर अभियंता म्हणून काम करताना त्यांनी अनेक नवीन प्रकल्प शहराला दिले. तपोवनातील मलशुद्धीकरण प्रकल्प त्यांच्याच कार्यकाळात तयार झाला. अतिशय कडक शिस्तीचे आणि अबोल अधिकारी म्हणून ते सर्वपरिचित होते. उमाळे यांच्या स्वेच्छा निवृत्तीवरून महापालिकेत मोठा वाद झाला होता.

- Advertisement -

स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज केलेल्या उमाळे यांना सेवेत कायम ठेवून घेण्याचा महासभेने केलेला ठराव राज्य सरकारने फेटाळल्याने उमाळेंना जून २०१० मध्ये कार्यमुक्त करणे महापालिका प्रशासनाला अखेर भाग पडले होते. उमाळेंच्या नोटिसीचा कालावधी संपला असतानाही त्यांना सेवेत माघारी बोलाविण्याचा ठराव महासभेने केला होता. १९८३ मध्ये महापालिकेत रुजू झालेले उमाळे यांचा २७ वर्षातील महापालिकेतील कार्यकाळ सदैव समरणात राहील.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -