घरताज्या घडामोडीपोलीस ठाण्याच्या आवारात ‘फ्री स्टाइल’; महिलांना जातीवाचक शिवीगाळ

पोलीस ठाण्याच्या आवारात ‘फ्री स्टाइल’; महिलांना जातीवाचक शिवीगाळ

Subscribe

तक्रार देण्यासाठी आलेल्या दोन महिलांना पाचजणांनी आडगाव पोलीस ठाण्याच्या आवारात फ्री स्टाइल हाणामारी केली. महिलांना जातीवाचक शिवीगाळ करत धमकी दिली. याप्रकरणी छाया राहुन नाडे यांनी आडगाव पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी पाचजणांविरुद्ध बेकायदा जमाव, हाणामारी व अ‍ॅट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुजा प्रल्हाद धुमाळ (सर्वजण रा.मिनाचंद्र सोसायटी, जत्रा हॉटेल-नांदुर लिंकरोड), प्रल्हाद धुमाळ, साक्षी प्रल्हाद धुमाळ, वैष्णवी प्रल्हाद धुमाळ, ओम प्रल्हाद धुमाळ अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, छाया नाडे यांची बहीण माया खडसे यांच्यासोबत पुजा धुमाळ यांचे भांडण झाले होते. याप्रकरणी माया खडसे व छाया नाडे मंगळवारी (दि.२८) रात्री १०.३० वाजता आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आल्या होत्या. त्या दोघी पोलीस ठाण्याच्या गेटबाहेर येताच पाचजणांनी त्यांना पकडले. या ठिकाणी दोघींना पाचजणांनी शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली. पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त प्रदीप जाधव करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -