घरताज्या घडामोडीमुंबई महापालिका आयुक्तांचे स्वीय सहाय्यक असलेले उपायुक्त पवार यांची बदली

मुंबई महापालिका आयुक्तांचे स्वीय सहाय्यक असलेले उपायुक्त पवार यांची बदली

Subscribe

मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण सिंह परदेशी यांचे नवे स्वीय सहाय्यक म्हणून चंद्रशेखर चौरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण सिंह परदेशी यांच्या बदलीची जोरदार हवा चालू असतानाच शुक्रवारी आयुक्तांचे स्वीय सहाय्यक असलेले उपायुक्त रमेश पवार यांची बदली झाली. पवार यांच्या जागी मालमत्ता विभागाचे उपायुक्त चंद्रशेखर चौरे यांची बदली करण्यात आली. त्यामुळे नवीन आयुक्तांच्या आगमनापूर्वी उपायुक्त पवार यांची बदली करून चौरे यांना महापालिकेने स्वागतासाठी तयार केले आहे. मुंबई महापालिका आयुक्तांचे स्वीय सहाय्यक म्हणून उपायुक्त रमेश पवार हे पदभार सांभाळत होते. परंतु साडेचार वर्षांपेक्षा अधिक काळ या पदावर राहिल्याने त्यांची बदली करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

महापालिका मालमत्ता विभागाचे प्रथम सहाय्यक आयुक्त आणि त्यानंतर उपायुक्त अशी जबादारी सांभाळणाऱ्या चंद्रशेखर चौरे यांची अखेर आयुक्तांचे स्वीय सहाय्यक म्हणून वर्णी लावण्यात आली. रमेश पवार यांनी यापूर्वी विभाग कार्यालयात काम केलेले आहे. मात्र आता त्यांच्यावर मालमत्ता विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यामुळे भविष्यात पवार यांच्यासमोर मोठे आव्हान राहणार आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या ज्या मालमत्ता भाडेकरारावर दिल्या असून त्यातील सुमारे २५० भूखंडाच्या मक्ता करार संपुष्टात आला आहे. याच्या नुतनीकरणाचा मोठा प्रश्न असून याबाबतच्या धोरणाचा मसुदा महापालिका सभागृहात प्रलंबित आहे. हे धोरण मंजूर झाल्यास अनेक मालमत्ताचे नुतनीकरण करण्याचा मार्ग मोकळा होईल आणि महापालिकेच्या महसुलात वाढ होईल.

- Advertisement -

हेही वाचा – ‘आपलं महानगर’च्या ठाणे आवृत्तीचा दमदार प्रकाशन सोहळा!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -