घरताज्या घडामोडीद्राक्ष निर्यात : शिपिंग कंटेनरचा मार्ग मोकळा

द्राक्ष निर्यात : शिपिंग कंटेनरचा मार्ग मोकळा

Subscribe

खासदार डॉ.भारती पवार यांची मध्यस्थी; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सूचना

नाशिक : देशात लॉकडाऊन चालू असल्याने ठप्प झालेली द्राक्ष निर्यातीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. व्यापार्‍यांनी विकत घेतलेले द्राक्ष शिपिंग कंटेनरच्या माध्यमातून पाठवले जाणार असून, या कंटेनरला शासकीय परवानगी मिळाली आहे. दिंडोरी मतदारसंघाच्या खासदार डॉ.भारती पवार यांच्याकडे द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांनी आपली कैफियत मांडली होती. त्यानंतर खासदार डॉ.पवार यांनी ऑडियो कॉन्फरन्सद्वारे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, शिपिंग मंत्री मनसुख मांडविया यांच्याशी संपर्क साधला. तसेच राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे चर्चा करुन कंटेनरला येण्यास परवानगी देण्याची मागणी केली. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही त्यांचे खासगी सचिव सचिन खेडकर यांना या प्रकरणी सहकार्य करण्यास सांगीतले. सचिव खेडकर यांनी उरण तहसीलदार अंधारे यांच्याशी संपर्क करून दोन गावच्या सरपंचांना बोलावून घेतले. नवी मुंबई येथील जे. एन. पी. टी. कडून येणार्‍या दोन्हीही कंटेनरवर शासकीय फलक लावून पास दिले. द्राक्ष निर्यातदार वर्गास उरणचे तहसीलदार अंधारे यांनी स्वतः संपर्क साधत द्राक्ष घेण्यास दोन कंटेनर इकडून पाठवल्याची माहिती दिली. त्यामुळे पडून खराब होणार्‍या द्राक्षांचे नुकसान टळले आहे.
&.
भाव उतरले
लॉकडाऊन घोषित होण्यापूर्वी द्राक्षाचे दर तेजीत होते. किरकोळ विक्रेत्यांना साधारणत: 75 ते 80 रुपये किलो दराने भाव मिळत होता. आंतरराष्ट्रीय बाजारात द्राक्षांची मागणी टिकून असल्याने शेतकर्‍यांनाही समाधानकारक दर मिळाला. मात्र, 21 दिवस बंदिस्त करण्याची घोषणा होताच द्राक्षाचे दर एकदम कोसळले. सद्यस्थितीला 5 रुपये किलो दराने द्राक्ष विकले जात आहेत. याचा शेतकर्‍यांना मोठा फटका बसला आहे.
&
द्राक्ष निर्यात होत नसल्यामुळे दर एकदम कोसळ्याचे शेतकरी सांगतात. उत्पादक व व्यापार्‍यांकडे पडून असलेले द्राक्ष निर्यात करण्यासाठी कंटेनरची व्यवस्था केली आहे. येत्या काही दिवसांत परिस्थिती सुधारेल.
-डॉ.भारती पवार, खासदार (दिंडोरी)

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -