घरमहाराष्ट्रनाशिकसुजॉय गुप्तांच्या अर्जावर उद्या निर्णय

सुजॉय गुप्तांच्या अर्जावर उद्या निर्णय

Subscribe

'अपना घर' दुर्घटनेतील मुख्य संशयित आरोपी

ध्रुवनगरमधील सम्राट ग्रुपच्या ‘अपना घर’ गृहप्रकल्पाच्या ठिकाणी पाण्याची टाकी फुटली. या दुर्घटनेत चार कामगारांच्या मृत्यू झाला. मुख्य संशयित आरोपी बांधकाम व्यावसायिक सुजॉय गुप्ता फरार आहेत. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज सादर केला आहे. या अर्जावर सोमवारी (ता.८) सुनावणी झाली असून मंगळवारी निर्णय होणार आहे, अशी माहिती गुप्तांचे वकील अ‍ॅड.जयदीप वैशंपायन यांनी दिली.

अपना घर गृहप्रकल्प दुर्घटनेत पाण्याच्या टाकीसाठी महापालिका नगररचना विभागाची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे समोर आले आहे. गंगापूर पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी ठेकेदार भाविन पटेल, आशिष सिंग, सचिन शेवडे, नारायण कडलग यांना अटक केली आहे. गुप्ता फरार आहेत. गुप्ता यांच्या वतीने अ‍ॅड.जयदीप वैशंपायन कामकाज पाहत आहेत. अटकपुर्व जामिनासाठी न्यायालयात सादर केलेल्या अर्जावर आज (ता.८) सुनावणी झाली. न्यायालयाने निर्णय राखून ठेवला असून निर्णय मंगळवारी होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -