घरमहाराष्ट्रनाशिकपावसाचा जोर कायम, पुढील चार दिवस बरसणार

पावसाचा जोर कायम, पुढील चार दिवस बरसणार

Subscribe

नांदूरमध्यमेश्वरमधून ३८ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू

नाशिक : जिल्ह्यातील इगतपुरी, त्रंबकेश्वर, दिंडोरी आणि नाशिक या तालुक्यांमध्ये पावसाची कधी संततधार तर कधी जोरदार बॅटिंग सुरु असल्याने गंगापूर, दारणा, पालखेड धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. गोदावरी ,दारणा कादवा या नद्यांचे पुराचे पाणी नांदूर मधमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दाखल झाले आहे. नांदूर मध्यमेश्वर धरणातून 3८ हजार ३४५ क्यूसेक पाण्याचा गोदावरी नदीतून जायकवाडीच्या दिशेने विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे गोदावरी नदी काठच्या गावातील नागरिकांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

शुक्रवारी सायंकाळपर्यंत २० मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. विसर्गामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. त्यामुळे किनार्‍यालगत असलेल्या रामकुंड आणि गोदाघाट परिसरातील अनेक मंदिरे पुराच्या पाण्याखाली गेली आहेत. तर, अनेक मंदिरांना पुराच्या पाण्याचा वेढा बसला आहे. गंगापूर प्रमाणेच दारणा, कडवा, पालखेड धरणांमधूनही मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे गोदावरी, दारणा, कादवा नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणात बाष्पयुक्त वारे हे उत्तरेकडे वाहत आहते. तर दुसरीकडे हिमालयाच्या पायथ्याशी उत्तर प्रदेशामध्ये कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र होतोय. यातच गुजरातमध्ये निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा हा महाराष्ट्राकडे सरकण्यास पोषक वातावरण निर्माण झाले आहे. पुढील एक ते दोन दिवस मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, सातारा या जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. जळगाव, औरंगाबाद, जालना आणि विदर्भातील तुरळक भागांत 18 आणि 19 सप्टेंबरला हलका पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाचे वर्तविला आहे. खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आहे. आतापर्यंतच्या पावसाच्या जोरावर खरिपातील सर्वच पिके बहरात आहेत. मात्र, यापुढेही पाऊस सुरुच राहिला तर शेतकर्‍यांचे नुकसान होणार आहे.

- Advertisement -
पूजाविधीत अडथळे

गोदावरीच्या पाण्याची पातळी वाढल्याने किनार्‍यावरील सर्व मंदिरे पाण्याखील गेली आहेत. त्यामुळे देशभरातून नाशिकमध्ये पुजेसाठी तसेच पिंडदान करण्यासाठी आलेल्या भाविकांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच, नदीकिनार्‍यावरील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचाही इशारा दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -