घरमहाराष्ट्रनाशिकहेल्मेट घातले असते तर ते आज आपल्यात असते

हेल्मेट घातले असते तर ते आज आपल्यात असते

Subscribe

अपघातात मृत झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांनी व्यक्त केल्या भावना

घराबाहेर गेलेला कर्ता पुरुष, मुलगा व मुलगी सुरक्षितरित्या परत येईल की नाही, याकडे कुटुंबातील प्रत्येकाचे लक्ष असते. बेशिस्त व विनाहेल्मेट दुचाकी चालवली तर मोठा अनर्थ घडण्याची शक्यता असते.दुचाकीचालकांसह पाठीमागे बसलेल्या व्यक्तींकडे हेल्मेट असते तर नक्कीच त्यांचे जीव वाचले असते,असे सांगतानाच वाहनचालकांना कळकळीची विनंती करत घराबाहेर जाताना न विसरता दुचाकी चालवताना हेल्मेट वापरा,अशी भावना अपघातात मयत झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांनी व्यक्त केली.

नाशिक शहरासह जिल्ह्यात दररोज विनाहेल्मेट अपघात होत आहेत. नाशिक शहरात विनाहेल्मेटमुळे पाच वर्षांत 397 वाहनधारकांना जीव गमवावा लागला आहे. 782 अपघातांत 825 व्यक्तींचा मृत्यू झाला असून, यात 467 व्यक्ती दुचाकीचालक होत्या. त्यापैकी 397 जणांनी हेल्मेटच घातले नसल्याचे दुर्दैवी वास्तव आहे. शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासह वाहनचालकांनी हेल्मेट व सीटबेल्टचा वापर करावा, यासाठी नाशिक पोलीस जनजागृती करत आहेत. पोलीस कारवाई फक्त दंडासाठी केली जाते, असा अनेक वाहनचालकांचा गैरसमज आहे. यंदा प्रथमच पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी अनोख्या पद्धतीने विनादंड पोलीस कारवाई सुरु केली आहे. परिणामी, आता वाहनचालक हेल्मेट वापरताना दिसू लागले आहेत.

- Advertisement -

प्रत्येकाने स्वत:च्या सुरक्षेसाठी आणि कुटुंबाच्या काळजीसाठी हेल्मेट घातले पाहिजे. हेल्मेट आपली सुरक्षा आहे, याकडे पोलीस विरुद्ध नागरिक असे पाहू नये. जे चालक एका छोट्याशा चुकीने आपला जीव गमावतात, त्यांच्या घरातला दु:खाचा अंधार वाहनचालकांनी डोळ्यासमोर आणण्याची गरज आहे. हेल्मेट नसल्याने मृत्यूमुखी पडलेल्या कर्त्या पुरुषांच्या कुटुंबाच्या वेदना समजून घेतल्या पाहिजे. अपघात टाळून जीव वाचविण्यासाठी प्रत्येकाने हेल्मेट नियमित वापरले पाहिजे. पेट्रोल महाग झाले तरी ते खरेदी केलेच जात आहे. त्याप्रमाणे हेल्मेटसुद्धा स्वत:चा जीव वाचवण्यासाठी खरेदी केलेच पाहिजे.

अनेकांच्या घरी दुचाकीसह कारसह इतर वाहने आहेत. परिणामी, किशोरवयातच मुले व मुली दुचाकीसह चारचाकी वाहने चालवत आहेत. त्यावेळी त्यांना वाहतूक नियम सांगितले जात नाही की लायसन्ससाठी आग्रह केला जात नाही. परिणामी, तीच मुले राज्य व राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने वाहने चालवत आहेत. त्यातून अनेकांनी कुटुंबातील सर्वांचा आवडता मुलगी व मुलीचा जीव गेला आहे. एका अपघातामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. त्यामुळे वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, वेगावर नियंत्रण ठेवावे, हेल्मेटचा नियमित वापरले पाहिजे.

- Advertisement -

सर सलामत तो पगडी पचास…

  • स्वत:च्या आणि कुटुंबाच्या काळजीसाठी हेल्मेट नियमित वापरा.
  • वेगमर्यादेचे उल्लंघन करणे टाळा अन्यथा होईल अपघात.
  • सिग्नलचा लाल दिवा लागल्यावर थांबा.
  • मोबाईलसाठी कव्हर वापरले जाते मग दुचाकीवर असताना हेल्मेट का नाही?
  • वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करा.
  • अपघातातील जखमींना मदत करा.
  • दुचाकीवरुन फक्त दोघांनी प्रवास करावा.

 

दुचाकी चालवण्यापूर्वी पेट्रोल, हवा, ब्रेक सुव्यस्थित असल्याची खात्री करावी एका बहिणीची कळकळीची विनंती
विनाहेल्मेटमुळे भाऊ निशांतचा मृत्यू झाला. एका बहिणीची वाहनचालकांना कळकळीची विनंती आहे की, घरी आपली आई व बहीण वाट पाहत आहे. आपल्याला घरी परत यायचंय. जसे घरातून निघतो तसे परत येताना आई व बहिणीला सुखरुप बघायचंय. हा विचार करुन प्रत्येक वाहनचालकाने घराबाहेर गेल्यानंतर वाहन चालवताना हेल्मेट सक्तीने घातले पाहिजे.
                                           – रोशनी शेख, मृत निशांतची बहीण, नाशिक

shantaram rautनाशिकमधील साईरत्न नगर येथून दुचाकीवरुन पत्नीसमवेत घराच्या दिशेने जात होतो. त्यावेळी स्वत: हेल्मेट परिधान केले होते. मात्र, पत्नीने हेल्मेट परिधान केले नव्हते. पाठीमागून आलेल्या एका ट्रकने जोरदार धडक दिली. त्या ट्रकने आम्हा दोघांना उडवले. मी हेल्मेट घातले होते म्हणून वाचलो. पण, पत्नीने हेल्मेट घातले नव्हते. अपघातात पत्नीच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्यातच तिचा मृत्यू झाला. जर तिने हेल्मेट घातले असते तर तिचा जीव वाचला असता. हेल्मेट जनजागृती मोहीम एक वर्ष आधी राबवला असता तर आज पत्नी जिवंत असती. प्रत्येक दुचाकीचालक व पाठीमागे बसलेल्यांनी काळजीने हेल्मेट वापरलेच पाहिजे.
– शांताराम राऊत, नवीन नाशिक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -