घरमहाराष्ट्रनाशिककुत्र्यांच्या भांडणात गरम पाणी अंगाखाली येवून दोन चिमुकल्या भाजल्या

कुत्र्यांच्या भांडणात गरम पाणी अंगाखाली येवून दोन चिमुकल्या भाजल्या

Subscribe

रुपाली ६० ते ७० टक्के भाजल्याने प्रकृती गंभीर

नाशिक : पाळीव कुत्रा आणि भटक्या कुत्र्यांमध्ये जोरदार भांडण सुरु असताना त्यांचा धक्का घरासमोर चुलीवर पाणी गरम करण्यासाठी ठेवलेल्या भांड्याला लागलेल्याने हे पाणी थेट शेजारीच झोपलेल्या दोन चिमुकलींच्या अंगाखाली गेले आणि त्या भाजल्या गेल्या.

गिरणारे जवळील देवरगाव येथे गुरुवारी  सकाळी ६ वाजता ही घटना घडली. यात रुपाली कराटे (वय ३ वर्षे) ही चिमुकली गंभीररीत्या भाजली गेली. तर तिची बहीण पल्लवी कराटे (वय ४) किरकोळ भाजली आहे. दोघींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.नातलगांच्या माहितीनुसार, धनाबाई कराटे या त्यांच्या दोन्ही मुली व भावासह राहतात. धनाबाई यांच्या पतीचे दोन वर्षापूर्वी निधन झालेे. घराशेजारीच चुलीवर पाणी तापवतात. गुरुवारी सकाळी त्यांनी पाणी गरम करण्यासाठी चुलीवर ठेवले. त्यावेळी पाळीव कुत्रा व भटक्या कुत्र्यांमध्ये भांडण झाले. त्यात चुलीवरील गरम पाण्याचे पातेले खाली पडले. चुलीशेजारी झोपलेल्या रुपाली व पल्लवी यांच्या अंगाखाली हे पाणी आले आणि त्यात रुपाली ६० ते ७० टक्के भाजली तर पल्लवी किरकोळ भाजली. दोघींना उपचारार्थ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -