घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रउद्योग मंत्र्यांच्या सकारात्मकतेमुळे पुन्हा आयटी पार्कला गती; नाशिक ठरणार आयटी हब?

उद्योग मंत्र्यांच्या सकारात्मकतेमुळे पुन्हा आयटी पार्कला गती; नाशिक ठरणार आयटी हब?

Subscribe

नाशिक : आडगाव -म्हसरूळ शिवारात ३३५ एकर जागेवर आयटी पार्क उभारण्यासाठी केंद्रीय लघुउद्योग मंत्री नारायण राणे यांनी प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश देउनही पालिकेच्या संथ कारभारामुळे हा प्रकल्प रखडला आहे. अखेर आमदार अ‍ॅड. राहूल ढिकले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेत प्रकल्पाचा पाठपुरावा केला. त्यानंतर २० फेब्रुवारी रोजी उद्योग, उर्जा व कामगार विभागाचे कार्यासीन अधिकारी वि. सो मेंढे यांनी महाराष्ट्र औद्योगीक विकास महामंडळ यांच्याकडून तात्काळ सविस्तर अहवाल मागवला आहे. त्यामुळे आयटी पार्क प्रकल्पाला पुन्हा एकदा गती मिळाली आहे.

मागील पंचवार्षिकमध्ये महापालिकेत भाजपची सत्ता असताना शेवटच्या वर्षात माजी महापौर सतीश कुलकर्णी यांनी महापालिका हद्दीत आयटी पार्क व लॉजिस्टिक पार्क उभारण्याचा निर्णय घेतला होता. आयटी पार्कसाठी आडगाव शिवाराची निवड करण्यात आली. या जागेवर एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट या तत्त्वावर जागा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी दहा जागामालकांनी तयारी दाखवली. आयटी पार्कसाठी मुलभूत सुविधा देण्याकरीता २० कोटीची तरतुदही केली गेली.

- Advertisement -

देशभरातील आयटी उद्योगांना निमंत्रित करण्यासाठी एका हॉटेलमध्ये केंद्रीय लघु व सूक्ष्म उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत विप्रो, टीसीएस, क्रेडिट सीस, केपीआयटी आदी कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सहभाग नोंदवून आयटी उद्योग उभारण्याची तयारी दर्शविली. आयटी पार्कला मिळत असलेला प्रतिसाद लक्षात ठाणे येथील एका कंपनीने एक रुपया मानधनावर सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून देण्याची तयारी दर्शवली. या प्रकल्पात जागा मिळवण्यापासून तर अन्य सुविधा देण्यासाठी केंद्र शासनाची आवश्यकता असल्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या दोन भेटीही घेतल्या गेल्या. मात्र पुढे महापालिकडून प्रक्रिया न झाल्यामुळे अ‍ॅड. ढिकले यांनी थेट शासनाकडे धाव घेतली. त्याची दखल घेत आयटी पार्क संदर्भात अहवाल मागितल्यामुळे रोजगाराबरोबरच नाशिकच्या विकासाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

आयटी पार्कमुळे नाशिक खर्‍या अर्थाने स्मार्ट होणार पुणे, बंगलोरसारख्या शहरांच्या विकासात आयटी पार्कने भर टाकली. आडगावजवळ आयटी पार्क झाल्यास बेरोजगारी मिटेल व शहर खर्‍या अर्थाने स्मार्ट होईल. जलदगतीने केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे. : अ‍ॅड. राहुल ढिकले, आमदार 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -