घरताज्या घडामोडीप्रेरणा पाटील हिची 'आयआयएम'मध्ये निवड

प्रेरणा पाटील हिची ‘आयआयएम’मध्ये निवड

Subscribe

कर्मवीर काकासाहेब वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थीनी

नाशिक : कर्मवीर काकासाहेब वाघ अभियांत्रिकी शिक्षण व संशोधन संस्थेच्या विद्युत अभियांत्रिकी विभागातील शेवटच्या वर्षातील विद्यार्थीनी प्रेरणा प्रवीण पाटील हिची इंडियन इन्स्टिटयूट ऑफ मॅनॅजमेन्ट (आयआयएम) रोहतक येथे पदव्युत्तर (मॅनॅजमेन्ट) शिक्षणासाठी निवड झाली आहे. भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या माहितीनुसार प्रेरणाची निवड कॉमन ऍडमिशन टेस्ट (कॅट) 2019 च्या परीक्षेमधील तिची कामगिरी व त्यानंतर झालेल्या ग्रुप डिस्कशन आणि मुलाखतीच्या आधारे करण्यात आली आहे. भारताच्या नॅशनल इंस्टीट्यूशनल रैंकिंग फ्रेमवर्क (एन. आय. आर. एफ.) संस्थेकडून दरवर्षी पहिल्या शंभर संस्थांची यादी जाहीर केल्या जाते. 2019 च्या यादीनुसार आयआयएम रोहतकचा भारतामध्ये 23 वा क्रमांक लागतो. त्यामुळे प्रेरणा हिची निवड हि निश्चितच अभिमानाची बाब आहे. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, विश्वस्त समीर वाघ, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. केशव नांदुरकर, विभागप्रमुख डॉ. कुशारे, व डॉ. मुंजे यांनी अभिनंदन केले.

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -