घरमहाराष्ट्रनाशिकजेलरोड:अमृत उद्यानाला ठेकेदाराचे कुलूप

जेलरोड:अमृत उद्यानाला ठेकेदाराचे कुलूप

Subscribe

कामाचे बिल न मिळाल्याने ठेकेदाराचा निर्णय.

नाशिकरोड: येथील जेलरोड भागातील सुसज्य व आकर्षक अमृत उद्यानाचे काम पुर्ण होऊन तब्बल दहा महिने उलटले असतांना महानगरपालिकेने कामाचे बिल न मिळाल्याच्या कारणास्तव ठेकेदाराने मनमानी करत उद्यानाला कुलूप लावल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे, नागरिकांनी मनपा प्रशासनाकडे अनेक तक्रारी करण्यात आल्यानंतरही मनपा अधिकारी डोळेझाक करत असल्याचे नागरिकांचे मत आहे.

प्रभाग १८ मधील राज राजेश्वरी भागातील अमृत उद्यानाचे लाखों रुपयांचे काम स्थानिक ठेकेदाराला दिले होते, सुसज्य उद्यान तयार झाल्यानंतर ठेकेदाराने मनपा कडे बिलाची मागणी केली, मात्र ते न मिळाल्याने ठेकेदाराने मनमानी करत थेट उद्यानाला कूलुप ठोकत मनपा व जनतेला वेठीस धरल्याचे नागरिकांनी सांगितले, या उद्यानाच्या आसपास कोणी येवू नये यासाठी भिंतीवर ऑईल टाकल्याने नागरिकांत प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. ऑईल टाकल्याने येथे लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, विशेष म्हणजे नगरसेवकांनी मनपा अधिकार्‍यांना माहिती दिल्यानंतरही उद्यान खुले होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

- Advertisement -

जेलरोड भागातील अत्यंत उत्कृष्ट व आकर्षक उद्यान बनवले आहे, मात्र, ठेकेदाराच्या चुकीच्या वागण्याने जनतेला त्याचा उपभोग घेता येत नाही. ठेकेदाराने केलेल्या कामाचे बिल रितसर मनपा प्रशासनाकडे मागावे, कुलूप लावून जनतेला वेठीस धरु नये. अन्यथा, याप्रकरणी ठेकेदाराला धडा शिकवला जाईल.
– विशाल संगमनेरे,नगरसेवक

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -