Monday, September 27, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम पाळत ठेवून सराफावर जीवघेणा हल्ला

पाळत ठेवून सराफावर जीवघेणा हल्ला

Related Story

- Advertisement -

पाळत ठेवून एका टोळक्याने सराफ व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना सातपूरच्या गंगासागर भागात शनिवारी (दि.५) रात्री 9.30 वाजेदरम्यान घडली. या घटनेनंतर हल्लेखोर फरार झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या हल्ल्यामुळे सराफ व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

टाक हे दुचाकीवरुन बॅग घेऊन स्वामी हाईट्स येथील श्री यमाई माता नावाचे दुकान बंद घराकडे परतत होते. श्रमिकनगरमधील नाल्याजवळ कोणी नसल्याचा फायदा घेत चार चोरटे दुचाकीवरुन त्यांच्याजवळ आले. त्यांच्या दुचाकीसमोर दुचाकी आडवी लावून संशयितांनी कोयत्यासह धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला मारहाण करत बॅग हिसकावून पळून गेले. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हल्ल्यांच्या घटनांत गेल्या काही दिवसांपासून वाढ झाली आहे. त्यामुळे आगामी सण व उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गस्त वाढवून हल्लेखोरांच्या मुसक्या आवळाव्यात.

-गिरीश नवसे, अध्यक्ष, सराफ असोसिएशन

- Advertisement -