घरक्राइम‘सिव्हिल’मध्ये रुग्णांना पैसे मिळत असल्याचे भासवत लुटले दागिने, नवे कपडे

‘सिव्हिल’मध्ये रुग्णांना पैसे मिळत असल्याचे भासवत लुटले दागिने, नवे कपडे

Subscribe

सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रवेशव्दाराजवळील घडना

कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयात पैसे मिळवत असल्याचे भासवून एका भामट्याने दोन बहिणींची फसवणूक करत सोन्याचे दागिने, नवे कपडे लंपास केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि.१९) जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशव्दाराजवळ घडली. याप्रकरणी मुन्नतजिम सिराजउद्दीन मुल्ला यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अनोळखी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, मुल्ला या बहीण अंकीकुज जोहरा कपडे खरेदीसाठी भद्रकाली परिसरात आले होते. एका दुकानात कपडे खरेदी केल्यानंतर त्या रोडने जात होत्या. त्यावेळी अनोळखी तरुण त्यांच्याजवळ आला. त्याने रफीक सरांची ओळख सांगत विश्वास संपादन केला. कोरोनाबाधित रुग्णांना जिल्हा रुग्णालयात पैसे वाटत असे सांगितले. त्यांना रुग्णालयाच्या प्रवेशव्दाराजवळ आणले. या ठिकाणी दोघींना बोलण्यात गुंतवत तरुणाने त्यांच्याकडील बॅग लंपास केली. त्याने बॅगसह सोन्याची अंगठी, चेन, बांगड्या, नवीन कपडे असा एकूण एक लाख १२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. शिवाय, अंकीकुज जोहरा यांचे एसटीचे ओळखपत्र, एटीएम कार्ड लंपास केला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक खैरनार करत आहेत.

Sushant Kirve
Sushant Kirvehttps://www.mymahanagar.com/author/ksushant/
गेल्या १२ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. क्राईम, आरोग्य, साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर लिखाण. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी आणि जीवघेण्या अपघातांमध्ये घट होण्यासाठी सातत्याने लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -