घरमहाराष्ट्रनाशिकगंगापूर धरण परिसरात बिबट्याचा वावर

गंगापूर धरण परिसरात बिबट्याचा वावर

Subscribe

पर्यटकांना खबरदारीच्या सूचना

 शहरात बिबट्याचा वावर दिसून येत असतानाच आता गंगापूर धरणाच्या भिंतीलगत असलेल्या पश्चिम वन विभागाच्या रोपवाटिकेलगत एका संरक्षक भिंतीजवळ ग्रामस्थांना बिबट्याचे दर्शन झाले. धरणक्षेत्राकडे गेलेल्या नागरिकांसह मळ्यातल्या मजूरांना हा बिबट्या दिसला. त्यामुळे पर्यटकांनी रोपवाटिकेलगत न जाण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.
नाशिक शहर आणि आसपासच्या परिसरात सातत्याने बिबट्याचा वावर दिसून आला आहे. अनेकदा शहराच्या मध्यवस्तीतही बिबट्याचे दर्शन झाल्याच्या घटना यापूर्वीही घडलेल्या आहेत. आता गंगापूर धरण परिसरातील मळे भागात काही पर्यटक व ग्रामस्थांना बिबट्याचे दर्शन झाले. ग्रामस्थांनी याबाबत नाशिक पश्चिम विभागाचे वन परिक्षेेत्र अधिकारी विवेक भदाणे यांना कळवले. यानंतर वन विभागाने परिसरात पाहणी केली असता रोपवाटिकेच्या कॅमेर्‍यात या परिसरात बिबट्याचे वास्तव्य असल्याचे निदर्शनास आले आहे. या भागात एका प्रौढ बिबट्यासह दोन बछडे असल्याची शक्यता वर्तवली गेली आहे. रोपवाटिकेलगतच्या भागात कुणीही न जाण्याच्या सूचना आता वन पथकाने केल्या आहेत. वनविभागाकडून ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पुरावा दाखवण्यासाठी शेतकर्‍यांकडून व्हिडीओ काढण्याचे धाडस

गोवर्धन परिसरातही बिबट्याचा वावर दिसून आला आहे. गोदावरीतीरी वसलेल्या या परिसरात पाण्याच्या शोधात येणार्‍या बिबट्याचे नागरिकांना अनेकदा दर्शन झाल्याने दहशत पसरली आहे. असे असताना शेतकर्‍यांनी वारंवार वनविभागाला तक्रार देऊनही गांभीर्य दाखवले गेले नसल्याने संताप व्यक्त केला जातोय.

- Advertisement -

जीव मुठीत घेऊन शेतकर्‍यांना आपली शेतीकामे करीवी लागत असल्याने अधिक संतप्त वातावरण आहे. वारंवार दिसून येणार्‍या बिबट्याचा वावर चिंतेचा विषय ठरत असताना राजू गोधडे या तरुणाने थेट बिबट्याचा व्हिडीओ काढण्याची हिंमत दाखवली आहे. वनविभागाकडून दखल घेतली जाऊन पिंजरा लावला जावा, यासाठी त्याने जीव धोक्यात घालून व्हिडियो आणि फोटो काढले. परिसरात तीन बिबट्या असल्याचे सांगण्यात येते. सोमवारी रात्रीदेखील परिसरातील शेतकरी गोरख गोधडे झोपेत असताना बिबट्याने त्यांच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना वाचवण्यात पाळीव कुत्रा भैरव याचाच बिबट्यासोबत झुंजीत बळी गेला. या घटनेने शेतकर्‍यांमध्ये दहशत पसरली असून, वनविभागाने पिंजरे लावत बिबट्या जेरबंद करण्याची मागणी केली जात आहे.

gorakh godhdeवनविभागाने एकच पिंजरा लावला आहे. येथे तीन बिबटे दिसून आले आहेत. दिवसाही बाहेर पडणे धोक्याचे आहे. आज कुत्रा गेला, पुढे घरतील व्यक्तींनाही धोका आहे.
                                   – गोरख गोधडे, गोवर्धन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -