घरमहाराष्ट्रनाशिक३० कृषी विक्रेत्यांचे परवाने निलंबित; कृषि विभागाचा दणका

३० कृषी विक्रेत्यांचे परवाने निलंबित; कृषि विभागाचा दणका

Subscribe

शेतकर्‍यांची फसवणूक करणार्‍यांवर कारवाईचे कृषीमंत्री भुसे यांचे आदेश

नाशिक : खतांचा ई पॉस मशिनवरील शिल्लक साठा आणि प्रत्यक्षात असलेला साठा यांचा ताळमेळ न बसणे, खते, बियाणे यांचा साठा व भावफलक न लावणे, शेतकर्‍यांना खते, बियाणे व औषधांचे पक्के बील न देणे अशा प्रकारच्या त्रुटी आढळून आल्याने 30 कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले आहे.

कृषीमंत्री दादा भुसे यांनी खरीपाच्या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांची फसवणूक टाळण्याकरीता तसेच खतासाठी व बियाण्यांसाठी त्यांची गैरसोय होउ नये यासाठी कडक कारवाईचे आदेश कृषी विभागाला दिले होते. त्यानुसार नाशिक जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयाने कृषी अधिक्षक विवेक सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपसंचालक कैलास शिरसाठ, गुणवत्ता नियंत्रण निरिक्षक अभिजिच घुमरे यांनी जिल्ह्यातील विविध सेवा केंद्राची तपासणी केली. यात 17 खते विक्री केंद्र, 6 बियाणे विक्री केंद्र, 7 किटकनाशके या केंद्रावर कृषी विभागाने कारवाई केली. युरिया खत हे टॉपच्या 20 खरेदीदारांना विक्री केल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली.

- Advertisement -

कोणत्या विक्रेत्यांवर झाली कारवाई 

ओम साई शेती उद्योग भंडार ओतुर (कळवण), कल्पक कृषी ट्रेंडिंग देवरगाव (चांदवड), किसान कृषी सेवा केंद्र कासारी (नांदगाव), जणगणना स्वंयरोजगार सेवा सहकारी संस्था, जय मल्हार कृषी मंदिर डोंगरगाव, (निफाड), दराडे कृषी विकास केंद्र अस्वली (इगतपुरी), निलेश कृषी सेवा केंद्र (दुमाला), पाटील अँग्रो टेटस बोरी (नांदगाव), बंधुप्रेम कृषी सेवा केंद्र (वडनेर भैरव), बालाजी कृषी सेवा केंद्र (नांदगाव), महाराष्ट्र खत विक्रे केंद्र (नाशिकरोड), यश अँग्रो एजन्सी (लासलगाव), वाजे कृषी मार्ट (टाकेद), राणा फर्टिलायझर (लासलगाव), विशाल कृषी मंदिर (कळवण), श्री स्वामी समर्थ एँग्रो सर्विसेस उमराळे (दिंडोरी), सप्तश्रृंगी कृषी सेवा केंद्र (पिंपळगाव डुकरा), सोनवणे कृषी उद्योग (सायखेडा), स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्र नांदुर (नांदगाव), स्वामी समर्थ फर्टीलायझर (दिंडोरी).

शेतकर्‍यांची फसवणुक व गैरसोय होवु नये यासाठी जिल्हातील सर्व केंद्रांना मार्गदर्शन करण्यात आले असुन त्यांना कारवाईच्या सुचना देखील देण्यात आल्या आहे. मात्र ज्या कृषी सेवा केंद्रामध्ये अनागोंदी कारभार आढळुन येईल त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. : विवेक सोनवणे, जिल्हा कृषी अधिक्षक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -