घरताज्या घडामोडीमालेगांवमध्येे रूग्ण बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक : जिल्हाधिकारी

मालेगांवमध्येे रूग्ण बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक : जिल्हाधिकारी

Subscribe

८३ रूग्णांवर उपचार सुरू : ७०० रूग्ण करोनामुक्त

करोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगाव शहरात आता परिस्थिती नियंत्रणात येत असून जिल्हयात आतापर्यंंत सातशेहून अधिक रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. मालेगांवमध्ये केवळ ८३ रूग्ण हे रूग्णालयांत उपचार घेत असून मालेगांवमध्ये रूग्ण बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याची माहीती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.

जिल्हयात करोना बाधितांची संख्या ९८३ वर जाउन पोहचली आहे तर करोनाच्या संसर्गापासून सुरक्षित मानल्या जाणार्‍या नाशिक शहरात मात्र या आजाराचा धोका वाढत असल्याचे दिसून येते. शहरात आतापर्यंत ११५ रूग्ण आढळून आले आहेत तर दोन दिवसांत पाच जणांचा करोनाने मृत्यु झाला. त्यामुळे मालेगांवनंतर आता नाशिक शहरांतही धोका वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याबाबत बोलतांना जिल्हाधिकारी सूरज मांढरे म्हणाले, जिल्हयातील करोना बाधितांची संख्या जरी वाढत असली तरी, तरी बरे होणार्‍यांचे प्रमाणही तितकेच वाढत आहे. सद्यस्थितीत जिल्हयात ९७० जणांना लागण झाली असली तरी, ७२५ रूग्ण बरे होउन घरी परतले आहेत. म्हणजेच ते करोना रूग्ण राहीले नसून २०४ जणच जिल्हयात करोना बाधित आहेत त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मालेगावबाबत चिंता व्यक्त केली जात होती. मालेगावमध्ये करोना बाधितांची संख्या ७०० हून अधिक झाली. मात्र तेथेही करोनातून बरे झालेल्या रूग्णांची संख्या अधिक आहे. आता केवळ ८७ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे मालेगावची परिस्थिती नियंत्रणात येत असून मालेगावमध्ये रूग्ण बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे ते म्हणाले.

- Advertisement -

सुरूवातीला लोक उपचारासाठी पुढे येत नसल्याने मृत्युचे प्रमाण वाढले होते. मात्र आता लोक उपचारासाठी पुढे येउ लागले आहेत. त्यामुळे रूग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. बाहेरून येणार्‍या लोकांमुळे हा धोक अधिक वाढत असल्याचे सर्वेक्षणावरून निदर्शनास आले आहे. अशा नागरिकांवर वॉच ठेवण्यात येत आहे त्यांची वेळोवेळी आरोग्य तपासणीही केली जात आहे. मालेगाव आणि नाशिकसाठी एक्स रे क्लिनिकही सुरू करण्यात आले आहे जेणकरून रूग्णाचा स्वॅबचा रिपोर्ट येण्यापूर्वीच त्याची लक्षणं जाणून घेवून त्याच्यावर लवकर उपचार करणे शक्य झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

उशिरा दाखल झाल्याने मृत्यु
जिल्हयात आतापर्यंत दुर्देवाने ५२ रूग्णांचा मृत्यु झाला. परंतु या रूग्णांची हिस्ट्री जर बघितली तर यातील काही रूग्णांमध्ये अगोदरच्या काही व्याधी होत्या जसे की, मधुमेह, हृदयरोग, किडनीचे विकार अशा प्रकारची लक्षणे होती. तर काही रूग्ण हे वयोवृध्द होते. आणि काही रूग्ण हे शेवटच्या टप्प्यात उपचारार्थ दाखल झाल्याचे दिसून आले. त्यामुळे हे रूग्ण रूग्णालयांत दाखल झाल्यानंतर दोन ते तीन दिवसांत त्यांचा मृत्यु झाला. जे रूग्ण बरे होउन घरी गेले त्यांच्यामुळे इतर लोकांना बाधा झालेली नाही त्यामुळे लक्षणे जाणवताच उपचारासाठी पुढे आल्यास धोका टळू शकतो असे जिल्हाधिकारी म्हणाले.

- Advertisement -

करोना बाधितांचा एकूण आकडा बघून नागरीकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. परंतू हेही लक्षात घेतले पाहीजे की, अजूनही या आजारावर कोणतेही उपचार नाही. परंतू आजार झाला आणि आपल्याला अगोदरच काही आजार असतील तर धोका पोहचू शकतो. ज्यांना काही आजार आहेत अशा लोकांनी घराबाहेर पडू नये. नागरीकांना काळजी घ्यावी लागेल. तरूणांनीही याबाबत काळजी घ्यावी. सोशल डिस्टसिंग पाळावेच लागतील. 
सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -