घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रबाजार समित्यांच्या निवडणूकांना पुन्हा 'ब्रेक'; १५ मार्चनंतर पुढील निर्णय

बाजार समित्यांच्या निवडणूकांना पुन्हा ‘ब्रेक’; १५ मार्चनंतर पुढील निर्णय

Subscribe

नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठी आठ दिवसांनी अंतिम मतदार यादी प्रसिध्द होत असताना राज्य सरकारने या निवडणुकांना 15 मार्च 2023 पर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुका स्थगित करण्यामागे राज्य सरकारने ग्रामपंचायत निवडणुकांचे कारण दिले आहे.

कोरोना संकटापासून लांबणीवर पडत असलेल्या बाजार समित्यांच्या निवडणुकांना सप्टेंबर २०२२ मध्ये मुहुर्त लागला होता. राज्य सहकार प्राधिकरणाने ३१ डिसेंबरअखेर निवडणुकीस पात्र असलेल्या जिल्ह्यातील १४ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर जाहीर केल्या होत्या. यात २९ जानेवारी मतदान तर ३० जानेवारी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार होता. या कार्यक्रमानुसार बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्या गत महिन्यात जाहीर झाल्या. जाहीर झालेल्या मतदारद्यांवर हरकती मागविण्याची प्रक्रीया बाजार समित्यांमध्ये सुरू आहे. त्यासाठी तालुक्यांमध्ये राजकीय हालचाली देखील सुरू झालेल्या होत्या. असे असताना राज्य शासनाने बाजार समित्यांच्या निवडणुकांना पुन्हा स्थगिती दिली आहे.

- Advertisement -

राज्य निवडणूक आयोगाकडून १ नोव्हेबंर २०२२ च्या पत्रान्वये राज्यातील एकूण ७ हजार ७५१ ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला आहे. सध्या जाहीर केलेल्या ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमानुसार नवीन निवडून येणारे ग्रामपंचायत सदस्य हे बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीत मतदान करण्यापासून वंचित राहू शकतील. त्यामुळे ग्रामपंचायतीचे नवीन निवडून येणारे सदस्य बाजार समितीच्या मतदार यादीत समाविष्ट करून मतदार यादी अंतिम होईपर्यंत निवडणूका घेण्यात येऊ नये असे पत्रात नमूद केले आहे. याबाबत, औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशात बाजार समितीच्या निवडणुका स्थगित केल्याचे म्हटले आहे.

येथील निवडणुकांना स्थगिती

नाशिक, पिंपळगाव, लासलगाव, सिन्नर, येवला, नांदगाव, मनमाड, मालेगाव, चांदवड, देवळा, घोटी, कळवण, सुरगाणा, दिंडोरी या बाजार समित्यांसाठी निवडणुक प्रक्रीया सुरू झालेली होती. मात्र, निवडणुका स्थगित झाल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -